कंपनी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयआयसीएने नियामक प्रशासन या विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या चौथ्या तुकडीची केली सुरुवात

Posted On: 18 NOV 2023 8:48PM by PIB Mumbai

 

आयआयसीए अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स मधील फोरम ऑफ इंडियन रेग्युलेटर्स (FOIR) केंद्राने आज मानेसर येथे, आपली विशेष ओळख असलेल्या नियामक प्रशासन (RG) अभ्यासक्रमाच्या चौथ्या तुकडीची औपचारिक सुरुवात केली. या अभ्यासक्रमात 52 सहभागींची नावनोंदणी झाली असून यात FOIR सदस्य संस्था तसेच FOIR नसलेल्या संस्थांतील विविध क्षेत्रातील सहभागींचा समावेश आहे.

FOIR सदस्यांमध्ये केंद्रीय विद्युत नियामक आयोग (CERC) आणि विविध राज्य विद्युत नियामक आयोग (SERC), भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय), भारतीय नादारी आणि दिवाळखोरी बोर्ड (IBBI), पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ (PNGRB), प्रमुख बंदरांसाठीचे वाहतूक प्राधिकरण (TAMP), भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI), आणि रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण (रेरा) पंजाब यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

खुल्या बाजारातील सहभागींमध्ये नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड), हायड्रोकार्बन्स महासंचालनालय (DGH), एनटीपीसी लिमिटेड आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

उद्घाटन सत्राला केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे अध्यक्ष जिष्णु बरुआ तसेच आयआयसीएचे महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण कुमार उपस्थित होते.

जिष्णु बारुआ यांनी आपल्या भाषणात, समकालीन नियामक आव्हानांना एकत्रितपणे संबोधित करण्यासाठी FOIR ची भूमिका मांडली आणि विविध क्षेत्रांच्या परस्पर सहकार्याच्या गरजेवर भर दिला.

***

M.Pange/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1977933) Visitor Counter : 97


Read this release in: English , Urdu , Hindi