संरक्षण मंत्रालय
जकार्ता येथे संरक्षण मंत्र्यांनी तिमोर-लेस्टेच्या संरक्षण मंत्र्यांशी केली चर्चा
तिमोर-लेस्टेच्या संरक्षण क्षेत्रातील विकास गरजांच्या पूर्ततेसाठी भारताच्या निरंतर पाठिंब्याचे दिले आश्वासन
Posted On:
17 NOV 2023 8:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2023
इंडोनेशिया दौऱ्याच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 17 नोव्हेंबर 2023 रोजी जकार्ता येथे तिमोर-लेस्टेचे संरक्षण मंत्री रिअर ॲडमिरल प्रा डॉ डोनासियानो डो रोसारियो दा कोस्टा गोम्स यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकी दरम्यान, संरक्षण मंत्र्यांनी तिमोर-लेस्टेच्या विशेषत: संरक्षण क्षेत्रातील विकासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारताच्या निरंतर पाठिंब्याचे आश्वासन दिले. उभय मंत्र्यांनी भारतात उत्पादित संरक्षण उपकरणांचा पुरवठा, क्षमता बांधणी आणि प्रशिक्षण यासह भविष्यातील सहकार्यासाठीच्या संभाव्य क्षेत्रांवर चर्चा केली.
तिमोर-लेस्टे येथे दूतावास सुरु करण्याच्या भारताच्या निर्णयाचे तिमोर -लेस्टेच्या संरक्षण मंत्र्यांनी स्वागत केले आणि त्यांच्या मंत्रालयाचा पाठिंबा दर्शवला . आसीयानचा चा पूर्ण सदस्य होण्यासाठी तिमोर-लेस्टेच्या प्रयत्नांना भारताने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी संरक्षणमंत्र्यांचे आभार मानले.
राजनाथ सिंह यांनी जकार्ता येथील वैविध्यपूर्ण आणि उत्साही भारतीय समुदायाच्या सदस्यांसह देशातील विविध भारतीय संघटनांचे नेते आणि सदस्यांशी संवाद साधला. त्यांनी भारतीय समुदायातील लोकांच्या भारताशी असलेल्या घनिष्ठ आणि दृढ संबंधांची प्रशंसा केली. डिजिटल इंडिया, नवीन शिक्षण धोरण, महिला सक्षमीकरण, जल जीवन अभियान, ग्रामीण रस्ते संपर्क सुविधा, प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण इत्यादी सारख्या गेल्या दशकातील भारत सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकला.त्यांनी प्लुइट, जकार्ता येथील शिव मंदिराला भेट देऊन प्रार्थना केली.
N.Chitale/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1977752)
Visitor Counter : 102