माहिती आणि प्रसारण मंत्रालय

विकसित भारत संकल्प यात्रेत आरसीएफ लि. ही नवरत्न कंपनी खतांच्या संतुलित वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये निर्माण करत आहे जागरूकता

Posted On: 17 NOV 2023 7:46PM by PIB Mumbai

मुंबई, 17 नोव्हेंबर 2023

राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅन्ड फर्टीलायझर मर्यादित  (आरसीएफ लि) ही आघाडीची नवरत्न कंपनी इतर खत उत्पादक कंपन्यांसह 'विकसित  भारत संकल्प यात्रा' (व्हीबीएसआय ) मोहिमेत सहभागी होत आहे.  भारत सरकारच्या पथदर्शी  योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हे या  देशव्यापी मोहिमेचे उद्दिष्ट आहे. कृषी क्षेत्रात,  अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे नॅनो युरिया, नॅनो डीएपी  आणि  इतर सूक्ष्म खतांच्या  फवारणी सह रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर टाळून मृदा आरोग्य   राखण्यासाठी खतांच्या संतुलित वापराबाबत महत्त्वाची माहिती देण्यात येत आहे.  शेतकरी सभा, माती परीक्षण, कृषी प्रदर्शने आणि मेळावे, पीक प्रात्यक्षिके इत्यादी आयोजित  करून  आरसीएफ शेतकरी समुदायामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेचे उद्घाटन पंतप्रधान   नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15 नोव्हेंबर 2023 रोजी झारखंडच्या खुंटी जिल्ह्यात आदिवासी गौरव दिनानिमित्त करण्यात आले. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, कृषी मंत्रालय आणि खत विभाग यांच्या विशेष सहभागाने भारत सरकारच्या अंतर्गत विविध मंत्रालयांद्वारे ही मोहीम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम भारतातील सर्व आदिवासी जिल्ह्यांमधून सुरू करण्यात आला असून, 24 जानेवारी 2024 पर्यंत संपूर्ण देशभर  सुरू राहणार आहे.

N.Chitale/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1977733) Visitor Counter : 92


Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali