वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीसाठी भागीदारी आणि हिंद-प्रशांत समृद्धीसाठी आर्थिक रुपरेषा गुंतवणूकदार मंच बैठकीत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल सहभागी


आयपीईएफ नेते आणि क्वालकॉम यांच्याबरोबर घेतल्या बैठका

Posted On: 17 NOV 2023 5:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2023

जागतिक पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीसाठी भागीदारी (पीजीआयआय) आणि हिंद-प्रशांत समृद्धीसाठी आर्थिक रुपरेषा (आयपीईएफ) गुंतवणूकदार मंच यात, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सहभाग घेतला. या मंचाच्या महत्वपूर्ण चर्चेचे सह-यजमानपद अमेरिकेच्या वाणिज्य सचिव जीना रायमोंडो आणि राष्ट्राध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार अमोस होचस्टीन यांनी भूषवले. हिंद-प्रशांत क्षेत्रातील खाजगी गुंतवणूक वाढवण्यासाठी सहयोगी कृती आणि सामायिक प्राधान्यक्रमांवर ही चर्चा केंद्रित होती.

फिजीचे पंतप्रधान सितवेनी राबुका आणि कोरियाचे व्यापार मंत्री दुक्गुन आहान यांच्यासह आयपीईएफ भागीदार देशांचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रमुख देखील यावेळी उपस्थित होते.

हवामानावर  अनुकूल परिणाम करणारे लाभ प्रदान करणे आणि सौर, ऊर्जा साठवण आणि ई-मोबिलिटीमधील गुंतवणुकीद्वारे भारतातील स्वच्छ-ऊर्जा संक्रमण प्रकल्पांच्या विकासाला गती देणे या उद्देशाने अमेरिकी आंतरराष्ट्रीय आर्थिक विकास महामंडळ (डीएफसी) तसेच राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत निधी (एनआयआयएफ) यांनी मिळून उभारलेल्या हरित संक्रमण निधीच्या माध्यमातून भारत आणि अमेरिका यांच्यातील निरंतर भागीदारीवर अमेरिकेच्या वाणिज्य सचिव रायमोंडो यांनी मंचाला संबोधित करताना प्रकाश टाकला.

स्तंभ-3 (स्वच्छ अर्थव्यवस्था) आणि स्तंभ-4 (न्याय्य अर्थव्यवस्था) वरील वाटाघाटी पूर्ण झाल्याबद्दल आयपीईएफ भागीदारांची केन्द्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी आपल्या भाषणात प्रशंसा केली. व्यवसाय सुलभता वाढवणे, व्यवसाय नियामक परिसंस्थेत पारदर्शकता आणणे, शाश्वत वाढ आणि विकास प्रदान करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेवरही त्यांनी भर दिला.

त्यानंतर, एपीईसी नेत्यांच्या अनौपचारिक संवादात गोयल यांनी भाग घेतला. 175 गिगावॅटचे अक्षय ऊर्जेचे उद्दिष्ट नऊ वर्षे आधीच यशस्वीरित्या पूर्ण करण्यावर प्रकाश टाकत भारताचे  पर्यावरण क्षेत्रातल्या  नेतृत्व त्यांनी अधोरेखित केले. याव्यतिरिक्त, शाश्वतता ही केवळ आकांक्षा नसून जीवनशैली आहे आणि हवामाना संबंधित कृती हे ओझे नसून नवोन्मेष आणि वाढीची संधी आहे असे भविष्य घडवण्यासाठी, जागतिक समुदाय म्हणून एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी जागतिक नेत्यांना केले.

दिवसाच्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, गोयल, जागतिक नेत्यांसह, आय पीईएफ नेत्यांच्या बैठकीत सहभागी झाले. या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह अनेक जागतिक नेते उपस्थित होते. महत्वाची खनिजे यावरील संवाद, गुंतवणूकीला चालना देणारे, उत्प्रेरक निधी, गुंतवणूकदार मंच, आयपीईएफ जाळे इत्यादी आयपीईएफच्या अनेक उपक्रमांची घोषणा या बैठकीत करण्यात आली.

पीजीआयआय. गुंतवणूकदार मंच, एपीईसीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याव्यतिरिक्त, एपीईसीच्या नेत्यांसाठींचे स्नेहभोजन आणि आय. पी. ई. एफ. च्या नेत्यांच्या बैठकांसह, दिवसभरात जागतिक नेते आणि कॉर्पोरेट दिग्गजांसोबत गोयल यांनी अनेक द्विपक्षीय आणि वैयक्तिक बैठका घेतल्या. पेरूचे परराष्ट्र व्यापार आणि पर्यटन मंत्री  जुआन कार्लोस मॅथ्यूज यांची त्यांनी भेट घेतली. द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंध वाढवण्याच्या मार्गांवर त्यांच्याशी चर्चा केली तसेच द्विपक्षीय मुक्त व्यापार करार  वाटाघाटीच्या प्रगतीचा आढावा घेऊन त्यावर त्वरित उपायही सुचवले. क्वालकॉम टेक्नॉलॉजी लायसेंसिंग अँड ग्लोबल अफेअर्सचे अध्यक्ष एलेक्स रॉजर्स यांचीही त्यांनी भेट घेतली. भारताची वेगाने विकसित होत असलेली सेमीकंडक्टर परिसंस्था आणि मजबूत नवोन्मेषी वातावरण क्वालकॉमसारख्या कंपन्यांना देऊ करत असलेल्या सहकार्याच्या अपार संधींवर  त्यांनी चर्चा केली.

N.Chitale/V.Ghode/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1977681) Visitor Counter : 132


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu