गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबईतील कचरा क्षेपण भूमी आणि घनकचरा व्यवस्थापन यासंदर्भातील उपायांवर केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री एच.एस. पुरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा

Posted On: 16 NOV 2023 6:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2023

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीपसिंह  पुरी यांनी घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित प्रलंबित समस्यांवर चर्चा करण्यासाठी आभासी माध्यमातून संयुक्त बैठक घेतली. महाराष्ट्राचे मुख्य सचिव, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे  आयुक्त, गृहनिर्माण आणि शहरी  व्यवहार मंत्रालयाचे  सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीला आभासी माध्यमातून उपस्थित होते.

मुंबई गतिमान शहरी केंद्र असल्याने निवासी वसाहती, व्यावसायिक ठिकाणे, झोपडपट्ट्या इत्यादींमधून निर्माण होणारा कचरा (दररोज अंदाजे 7500 टन) व्यवस्थापित करण्यासाठी आव्हाने आहेत.  विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमधून निर्माण होणारा ओला आणि सुका कचरा व्यवस्थापन, बांधकाम आणि बांधकाम पाडल्यामुळे निर्माण होणारा  कचरा यासंबंधीच्या विविध मुद्द्यांसह विविध कचरा व्यवस्थापन प्रकल्पांच्या प्रगतीवर चर्चा करण्यात आली. मुलुंड आणि देवनार येथील कचरा क्षेपण भूमीसंदर्भात जैविक उपायांवरही  चर्चा झाली. कचऱ्यापासून संपत्ती आणि चक्रीय अर्थव्यवस्थेचे उच्च क्षमता क्षेत्र लक्षात घेता ओएमसी (तेल विपणन कंपन्या )च्या सहकार्याने जैव -सीएनजी संयंत्रांना कचरा देण्यासंदर्भात  सहमती दर्शवण्यात आली.

मुंबईसाठी घनकचरा प्रक्रिया आणि कचरा क्षेपण भूमी संदर्भातील  उपायांसाठी आपत्कालीन कृती आराखडा तयार करण्याच्या दृष्टीनेगृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाचे  सचिव   यांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयामधील 3 सदस्यांचे पथक  आणि आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेची   (बीएमसी ) 3 सदस्यी यपथक  नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.हा आराखडा तयार केल्यानंतर  मुंबई महानगरपालिकेसाठी कृती योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्ग तयार होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबर 2021 रोजी स्वच्छ भारत अभियान -शहरी 2.0 अंतर्गत भारतीय शहरे कचरामुक्त करण्याच्या योजनेची घोषणा केली होती.अभियानाअंतर्गत मुख्य उद्दिष्टांपैकी एक म्हणजे ‘लक्ष्य शून्य कचरा क्षेपणभूमी.'म्हणजे शहरातील सुमारे 15,000 एकर जमीन  व्यापलेल्या 16 कोटी टन कचरा असलेल्या कचरा क्षेपणभूमीला पर्याय शोधण्याच्या दृष्टीने उपाय शोधणे. या  अभियानाच्या  उद्दिष्टाच्या अनुषंगाने, भारत सरकारने  स्वच्छ भारत अंमलबजावणीकरिता  महाराष्ट्रासाठी 3400 कोटी रुपयांची  तरतूद केली आहे.

 

S.Kakade/S.Chavan/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1977460) Visitor Counter : 134


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi