आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयुष्मान भारत डिजिटल मिशन(एबीडीएम) एकात्मिकरण आणि भारतीय विमा नियामक विकास प्राधिकरणाच्या(IRDAI) सहकार्याने राष्ट्रीय आरोग्य दावे विनिमय(NHCX) अंगिकृत करण्यासंदर्भात राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाकडून(एनएचए) एक्सलरेटर कार्यशाळेचे आयोजन

Posted On: 14 NOV 2023 9:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर 2023

राष्ट्रीय आरोग्य दावे विनिमय, हा राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने विकसित केलेला डिजिटल आरोग्य दाव्यांचा मंच कार्यरत करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण(एनएचए) आणि भारतीय विमा नियामक विकास प्राधिकरण (IRDAI) यांनी भागीदारी केली आहे.  भारतीय विमा नियामक विकास प्राधिकरण (IRDAI) ने जून 2023 मध्ये जारी केलेल्या एका परिपत्रकाच्या अनुषंगाने हा उपक्रम हाती घेण्यात येत आहे, ज्यामध्ये या विमा प्राधिकरणाने सर्व विमा कंपन्या आणि पुरवठादारांना राष्ट्रीय आरोग्य दावे विनिमय(NHCX) या मंचावर येण्याची सूचना केली होती.

आरोग्यनिगा आणि आरोग्य विमा परिसंस्थेतील विविध हितधारकांसोबत दाव्यांविषयीच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठीचे एक दालन म्हणून एनएचसीएक्स काम करेल.

एनएचसीएक्स सोबत एकात्मिकरणामुळे आऱोग्य दाव्यांची आंतरपरिचालन प्रक्रिया अतिशय सुलभ  होईल, विमा उद्योगात कार्यक्षमता आणि पारदर्शकतेत वाढ होईल आणि विमा धारकांना आणि रुग्णांना लाभ होईल.

या संदर्भात नवी दिल्ली येथे 7 ते 9 नोव्हेंबर दरम्यान, एका तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मुख्यत्वे रुग्णालय सुविधा पुरवठादारांना एनएचसीएक्सवर आणण्याचे आणि विमा कंपन्यांचे एनएचसीएक्ससोबत संपूर्ण एकात्मिकरणाचे उद्दिष्ट ठेवून याचे आयोजन करण्यात आले. एनएचए आणि आयआरडीएआय यांनी आयोजित केलेल्या कार्यशाळांच्या मालिकेतील ही तिसरी कार्यशाळा होती. पहिल्या दोन कार्यशाळांचे आयोजन यावर्षी ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात झाले होते आणि त्यामध्ये विमा कंपन्या आणि टीपीए सहभागी झाले होते. 45 संघटना-विमा कंपन्या, टीपीए आणि रुग्णालये यांचे 150 पेक्षा जास्त व्यावसायिक या कार्यशाळांमध्ये सहभागी झाले होते. या कार्यशाळांमध्ये विमा कंपन्यांनी केलेली उत्साहवर्धक प्रगती विचारात घेऊन या संघटनांना एनएचसीएक्स चे प्रायोगिक तत्वावर परिचालन करण्यासाठी वन नेटवर्क रुग्णालयासोबत त्यांच्या सर्वात जास्त लोकप्रिय किरकोळ उत्पादनाची निवड करण्याचा सल्ला देण्यात आला.

डिजिटल आरोग्य व्यवहारांच्या अंगिकाराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशातील रुग्णांच्या आरोग्य दस्तावेजांचे डिजिटायजेशन करण्यासाठी जानेवारी 2023 पासून एनएचएने डिजिटल हेल्थ इन्सेंटिव्ह स्कीम(DHIS) या योजनेंतर्गत आर्थिक प्रोत्साहनलाभ देखील जाहीर केले आहेत. डीएचआयएस अंतर्गत विमा दाव्यांच्या प्रक्रियेत कार्यक्षमता वाढवण्यासाठी एनएचसीएक्सच्या माध्यमातून प्रत्येक विमा दावा व्यवहारासाठी प्रतिदावा 500 रुपये किंवा दाव्याच्या रकमेच्या 10 टक्के यापैकी जी कमी असेल ती रक्कम प्रोत्साहननिधी म्हणून रुग्णालयांसाठी दिली जाईल. डीएचआयएसबाबत अधिक माहिती  https://abdm.gov.in/DHIS या ठिकाणी उपलब्ध आहे.

 

S.Kane/S.Patil/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1976994) Visitor Counter : 127


Read this release in: English , Urdu , Hindi