ऊर्जा मंत्रालय

आयआयटीएफ- 2023 मध्ये ऊर्जा मंत्रालयाने सादर केले ऊर्जा क्षेत्रातील उपक्रम; केंद्रीय ऊर्जा तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी ऊर्जा दालनाचे केले उद्‌घाटन

Posted On: 14 NOV 2023 7:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर 2023

नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर सुरू असलेल्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2023 मध्ये, भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने उभारलेल्या  ऊर्जा दालनाचे उद्‌घाटन आज केंद्रीय ऊर्जा तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांच्या हस्ते झाले. ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख उपक्रम देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उद्योगांसमोर मांडणे तसेच सरकारच्या योजना आणि धोरणांबाबत जनजागृती आणि सहभाग वाढवणे हे या दालनाचे उद्दिष्ट आहे. या दालनाबाबतचे माहितीपत्रक तुम्ही येथे पाहू शकता.

या दालनात अधोरेखित करण्यात आलेल्या धोरणात्मक उपक्रमात आणि संकल्पनामध्ये राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन, कार्बन कॅप्चर तंत्रज्ञान, एक सूर्य  - एक जग - एक ग्रीड, नवीकरणीय ऊर्जेद्वारे सार्वत्रिक ऊर्जा उपलब्धता, वीज (ग्राहकांचे हक्क) नियम, स्मार्ट उर्जा (स्मार्ट ग्रीड, स्मार्ट मीटर) ग्रिड स्थिरता, ऊर्जा संक्रमण, चार्जिंगच्या पायाभूत सुविधा आणि ई-मोबिलिटीचा मार्ग म्हणून उदंचन जलविद्युत प्रकल्प यांचा समावेश आहे. याशिवाय या दालनात कार्यरत प्रारुपे मांडण्यात आली असून परस्परसंवादी चर्चासत्रेही आयोजित करण्यात आली आहेत. या दालनात गेम झोन देखील उभारण्यात आला आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या अभ्यागतांपुढे जिवंत आणि आकर्षक पद्धतीने उर्जा क्षेत्राची माहिती सादर करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे.

उद्घाटनानंतर माध्यमांना संबोधित करताना, केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री सिंह यांनी आगामी COP28, 2023 च्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या स्थितीबद्दल माहिती दिली. सर्वात आधी विकसित देशांनी उत्सर्जन कमी करणे आवश्यक आहे, यावर मंत्र्यांनी भर दिला. वातावरणातील सुमारे 85% कार्बन डायऑक्साइड भार हा विकसित देशांनी औद्योगिकीकरणाचा मार्ग अवलंबल्यामुळे आहे. भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या 17% आहे तर कार्बन डाय ऑक्साईड भार मध्ये भारताचे योगदान केवळ 3.5% आहे, असे सिंह यांनी सांगितले.

वाढत्या अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या विजेच्या गरजेबाबत भारत कोणतीही तडजोड करणार नाही, यावर केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला. आपण विकसित होण्याची गरज आहे. त्याचबरोबर हा विकास अत्यंत जबाबदारीने करणे आवश्यक आहे आणि आम्ही ते जबाबदारीने करू. 2030 पर्यंत बिगर - जीवाश्म-इंधन स्रोतांमधून 40% स्थापित उर्जा क्षमतेचे राष्ट्रीय निर्धारित योगदान लक्ष्य गाठण्यात आपण नऊ वर्षे पुढे आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.

 

 S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 



(Release ID: 1976962) Visitor Counter : 85


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil