आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
बेचाळीसाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील आरोग्य दालनाचे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांच्या हस्ते उद्घाटन
Posted On:
14 NOV 2023 4:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर 2023
"उपलब्ध असलेल्या आणि लोकांसाठी सुलभ असलेल्या आरोग्य सेवांच्या श्रेणीच्या वाढत्या गतीवर लक्ष केंद्रित करून आरोग्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांचे सादरीकरण करण्याची संधी हा व्यापार मेळा प्रदान करतो, असे नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल यांनी म्हटले आहे. 42 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (IITF) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव सुधांश पंत यांच्या उपस्थितीत आयुष्मान भव आरोग्य दालनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या या वर्षीच्या दालनाची संकल्पना "वसुधैव कुटुंबकम, व्यापाराद्वारे एकत्र", तर आरोग्य दालनाची संकल्पना "आयुष्मान भव" आहे.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. पॉल यांनी प्रतिबंधात्मक, उपचारात्मक आणि पुनर्वसनशील आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या विविध आरोग्य उपक्रमांचे कौतुक केले. विशेषतः आयुष्मान भव अंतर्गत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सर्वसमावेशक आरोग्य योजनांची जनतेला माहिती दिली. मंडपातील स्टॉल्सची प्रशंसा करताना, त्यांनी रोगांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या महत्त्वावर आणि त्यामुळे आवश्यक उपचारांचा लाभ घेण्यावर आणि कोणत्याही प्रतिकूल परिणामांना शक्य तितके कमी करण्यावर भर दिला. डॉ. पॉल यांनी जन आंदोलन चळवळीचे योगदान अधोरेखित केले. लोकांमध्ये जागरूकता चांगल्या आरोग्य पद्धतींचे समर्थन करून वर्तनात्मक बदल घडवून आणेल, असे ते म्हणाले.
सुधांश पंत यांनी डिजिटल आरोग्य उपक्रमांवर भर दिला आणि त्यांचा सार्वत्रिक प्रभाव आणि उपयुक्तता अधोरेखित केली. "आयुष्मान कार्डमुळे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून वंचितांना मोफत आरोग्यसेवेचे लाभ मिळणे सुनिश्चित होत आहे" असे ते म्हणाले. भागधारकांनी या कार्यक्रमात उपलब्ध असलेल्या स्टॉल्समध्ये सहभागी व्हावे आणि आरोग्य उपक्रमांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.
G.Chippalkatti/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1976890)
Visitor Counter : 99