गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
शहरांसाठीच्या 'आईना (AAINA) डॅशबोर्ड फॉर सिटीज' पोर्टलचा प्रारंभ
Posted On:
13 NOV 2023 9:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर 2023
गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने (MoHUA),13 नोव्हेंबर 2023 रोजी ''आईना (AAINA) डॅशबोर्ड फॉर सिटीज' पोर्टल www.aaina.gov.in ची सुरुवात केली आहे. देशभरातील शहरी स्थानिक संस्था (ULB) या आद्य उपक्रमात सहभागी होऊ शकतात. या पोर्टलच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था स्वेच्छेने,आपल्याकडील मुख्य डेटा (महत्त्वाची माहिती) सोप्या, सहज भरता येण्याजोग्या, डेटा एंट्री फॉर्मद्वारे नियमितपणे जमा करू शकतील.
'आईना' (AAINA) डॅशबोर्डचे प्राथमिक उद्दिष्टे म्हणजे, हे डॅशबोर्ड शहरांना (i) ते इतर शहरांच्या तुलनेत कशी कामगिरी करत आहेत ते पाहण्यास मदत करते, (ii) आपल्यात सुधारणा करण्यासंदर्भातील शक्यता आणि सुधारणेला वाव असणाऱ्या क्षेत्रांकडे निर्देश करून त्यांना प्रोत्साहित करणे आणि (iii) ज्ञानार्जनाची संधी प्रदान करून आघाडीवर असलेल्यांसोबत कार्य करण्याची संधी मिळवून देणे. स्थानिक स्वराज्य संस्थांची कोणतीही गटवारी न करता, आईना (AAINA) डॅशबोर्ड समान रूपाने विविध शहरांना परस्पर तुलना करण्यासाठी आणि या शहरांमध्ये असलेल्या चांगल्या पद्धती आत्मसात करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून कार्य करते.
हे डॅशबोर्ड स्थानिक स्वराज्य संस्थांनी जमा केलेला डेटा हा पाच प्रमुख निर्देशांकांच्या आधारावर सादर करते ज्यामध्ये (i) राजकीय आणि प्रशासकीय संरचना (ii) वित्त (iii) नियोजन (iv) नागरिककेंद्रित प्रशासन आणि (v) मूलभूत सेवा सुविधांची पोच यांचा समावेश आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था (ULB) आपल्याकडील डेटा डॅशबोर्डच्या पोर्टलवर लॉग इन करून जमा करू शकतात ज्यामध्ये ऑडिट झालेली खाती आणि सेल्फ-रिपोर्टेड परफॉर्मन्स मेट्रिक्ससह अर्थात स्वतःच्या कामगिरीचा अहवाल याचा समावेश असू शकतो. स्थानिक स्वराज्य संस्था सुरुवातीला प्रदान केलेली माहिती, गरजेनुसार पोर्टलवर कधीही विनाशुल्क अद्यावत करू शकतील. या डॅशबोर्डची निर्मिती ही स्थानिक स्वराज्य संस्था संबंधित डेटा एकत्रित करण्याच्या कामी कायमस्वरूपी व्यासपीठ म्हणून करण्यात आली आहे, जी नियमितपणे अद्ययावत केली जाईल. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्रिय सहकार्याने, आईना (AAINA) डॅशबोर्ड फॉर सिटीज’ चे उद्दिष्ट आहे की, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्वपूर्ण कामगिरीचा एक मजबूत डेटाबेस तयार करणे, जो सर्व भागधारकांसाठी खुला असेल आणि नंतर तो लोकप्रिय झाल्यानंतर सार्वजनिक दृष्ट्या लोकांसाठी खुला होईल. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मंत्रालय गरजेच्या आधारावर डेटा जमा करण्याच्या प्रक्रियेत स्थानिक स्वराज्य संस्था ULB/राज्यांना सहाय्य प्रदान करेल.
N.Chitale/V.Yadav/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1976764)
Visitor Counter : 140