पंतप्रधान कार्यालय
अयोध्या दीपोत्सवाच्या ऊर्जेपुढे पंतप्रधान नतमस्तक
प्रविष्टि तिथि:
12 NOV 2023 8:14PM by PIB Mumbai
अयोध्या दीपोत्सवाची ऊर्जा देशात नवीन चैतन्य निर्माण करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. प्रभू श्रीराम सर्व देशवासीयांना आशीर्वाद देतील आणि सर्वांसाठी प्रेरणास्थान बनतील अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर टिप्पणी केली:
"विस्मयजनक, अलौकिक आणि अविस्मरणीय!
लाखो दिव्यांनी उजळून निघालेल्या अयोध्या नगरीच्या दीपोत्सवाने संपूर्ण देश प्रकाशमय होत आहे. यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेमुळे संपूर्ण भारतात नवा जोम आणि उत्साह संचारत आहे. प्रभू श्रीरामांनी सर्व देशवासियांचे कल्याण करावे आणि माझ्या सर्व कुटुंबियांसाठी प्रेरणास्थान बनावे अशी माझी इच्छा आहे.
जय सीता राम!"
***
S.Patil/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1976525)
आगंतुक पटल : 141
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam