संरक्षण मंत्रालय
रिअर ऍडमिरल राजेश धनखड यांनी नौदलाच्या ‘ईस्टर्न फ्लीट’चा कार्यभार स्वीकारला
Posted On:
11 NOV 2023 5:26PM by PIB Mumbai
रिअर ऍडमिरल राजेश धनखड यांनी 10 नोव्हेंबर 2023 रोजी रिअर ऍडमिरल गुरचरण सिंग यांच्याकडून ईस्टर्न फ्लीटचा , द स्वोर्ड आर्म ऑफ द ईस्टर्न नेव्हल कमांडचा कार्यभार स्वीकारला. विशाखापट्टणम मधील नेव्हल डॉकयार्ड येथे झालेल्या एका शानदार समारंभात धनखड यांनी हा कार्यभार स्वीकारला.
रिअर ऍडमिरल राजेश धनखड यांची 1 जुलै 1990 रोजी भारतीय नौदलात नियुक्ती करण्यात आली होती आणि ते नौवहन आणि दिशादर्शन मधील तज्ञ आहेत. फ्लॅग ऑफिसर हे प्रतिष्ठित नौदल अकादमी, डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत आणि त्यांनी जपानमधून हायर कमांड कोर्स पूर्ण केला आहे.
33 वर्षांच्या आपल्या गौरवशाली कारकिर्दीत, फ्लॅग ऑफिसरनी पाँडिचेरी, गोदावरी, कोरा आणि म्हैसूर या युद्धनौकांवर तज्ञांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यांनी पूर्वीच्या प्रोजेक्ट 15 ट्रेनिंग टीम, नेव्हिगेशन आणि डायरेक्शन स्कूल आणि ऑफिसर्स कॅडेट स्कूल, सिंगापूर येथे प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्या कमांड नियुक्तींमध्ये आयएनएस दिल्लीवरील कार्यकारी अधिकारी आणि आयएनएस घडियाल ,मुंबई आणि विक्रमादित्य वर कमांडिंग ऑफिसर यांचा समावेश आहे. त्यांच्या उल्लेखनीय कर्मचारी आणि परिचालन नियुक्त्यांमध्ये नौदल योजना संचालनालयात सहसंचालक आणि संचालक, कार्मिक संचालनालयात प्रधान संचालक/Cmde(Pers) यांचा समावेश आहे. फ्लॅग रँकमध्ये, त्यांनी चीफ स्टाफ ऑफिसर (प्रशिक्षण), फ्लॅग ऑफिसर सी ट्रेनिंग आणि कमांडंट, नेव्हल वॉर कॉलेजची म्हणून काम पाहिले आहे. आयएनएस विक्रांतच्या स्वीकृती चाचण्यांवर देखरेख ठेवण्यासाठी स्वीकृती चाचण्या पथकाचे अध्यक्ष म्हणूनही अतिरिक्त कार्यभार पार पाडला आहे.
फ्लॅग ऑफिसरना 2015 मध्ये एडन आणि अल-होडेदा, येमेन येथील भारतीय नागरिकांच्या बिगर लढाऊ बचाव मोहिमेतील सहभागासाठी नौसेना पदक (शौर्य) प्रदान करण्यात आले होते.
गेल्या 11 महिन्यांत, ईस्टर्न फ्लीटने, रिअर ऍडमिरल गुरचरण सिंग यांच्या नेतृत्वाखाली, लढाऊ सज्जता आणि परिचालनाची उच्च पातळी राखली आहे आणि विविध मिशन-आधारित आणि परिचालन तैनाती तसेच मैत्रीपूर्ण परदेशी नौदलांसोबत अनेक द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सरावात भाग घेतला आहे.
***
S.Patil/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1976431)
Visitor Counter : 144