उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दीपावलीच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 11 NOV 2023 3:41PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दीपावलीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या संदेशाचा संपूर्ण मजकूर खालीलप्रमाणे आहे -

प्रकाशाचा सण असलेल्या दीपावलीच्या, शुभ आणि आनंदाच्या प्रसंगी मी, माझ्या सर्व देशवासियांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा देतो.

मोठ्या श्रद्धेने आणि मोठ्या आनंदाने साजरी होणारी दीपावली, अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक असून, या सणामुळे लोकांच्या जीवनात आशा आणि सद्गुणांची चिरस्थायी भावना जागृत होते.

दीपावलीचा सण धार्मिक आणि सात्विक जीवन आचरणात आणण्याबरोबरच कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या सर्वोत्तम क्षमतेने आपले कर्तव्य पार पाडण्यासाठीचा आपला विश्वास दृढ करतो.

ही दिवाळी आपल्या देशाला समृद्धी आणि यशाने भरलेल्या भविष्याकडे घेऊन जाणाऱ्या आशेचा किरण बनावी आणि  या सणाचे तेज आपल्या अंतःकरणात ज्ञान, विवेक आणि करुणा या गुणांचा प्रसार करो.

उपराष्ट्रपतींच्या संदेशाचा हिंदी अनुवाद खालीलप्रमाणे आहे -

मैं दीपावली के इस शुभ अवसर पर सभी देशवासियों को हार्दिक बधाई और शुभकामनाएं देता हूं।

अटूट श्रद्धा और खुशियों के साथ मनाई जाने वाली दीपावली अंधकार पर प्रकाश की विजय का प्रतीक है, यह त्योहार लोगों के जीवन में आशा और सदाचार की भावना का संचार करता है।

दीपावली का त्योहार धार्मिक और सात्विक जीवन जीने और सभी परिस्थितियों में अपनी सर्वोत्तम क्षमता से अपना कर्तव्य निभाने में हमारे विश्वास को दृढ़ करता है।

यह दिवाली हमारे देश को समृद्धि और सफलता से भरे भविष्य की ओर ले जाने वाली आशा की किरण बने। इस दीपोत्सव का प्रकाश हमारे हृदय में ज्ञान, विवेक और करुणा का संचार करे।

***

S.Patil/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1976400) आगंतुक पटल : 152
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil