संरक्षण मंत्रालय

भारत आणि बांगलादेश नौदलांचा समन्वित गस्त (कॉपेट) आणि बोंगोसागर सराव

Posted On: 10 NOV 2023 4:00PM by PIB Mumbai

 

भारतीय नौदल आणि बांगलादेश नौदल यांच्यातील  बोंगोसागर -23 हा चौथा  द्विपक्षीय सराव आणि दोन्ही नौदलांद्वारे पाचवा  5 वा समन्वित गस्त (कॉर्पोट) सराव 07 ते 09 नोव्हेंबर 2023 या कालावधीत उत्तर बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आला होता. दोन्ही नौदलातील जहाजांनी आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेवर (आयएमबीएल ) संयुक्त गस्त घातली आणि त्यानंतर आंतरकार्यक्षमता वाढवण्यासाठी सागरी सराव केला.

बांगलादेश नौदलाची  जहाजे अबू बकर, अबू उबैदाह आणि एमपीए यांच्यासोबत भारतीय जहाजे कुठार, किल्टान  आणि सागरी गस्ती विमान (एमपीए) डॉर्नियर  यांनी या सरावात भाग घेतला. जहाजांनी संवाद  सराव , पृष्ठभागावर  गोळीबार , सामरिक डावपेच  आणि इतर सराव करत सामूहिक उद्दिष्ट गाठली.   कॉर्पोट -23 मध्ये दोन नौदलांदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सरावामध्ये पहिल्या मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) सरावाचा समावेश होता यामधये  समुद्रात शोध आणि बचाव परिस्थितीसंदर्भात  सराव करण्यात आला  .  नियमित द्विपक्षीय सराव आणि समन्वित गस्त यामुळे दोन्ही नौदलांमधील परस्पर सामंजस्य आणि सहकार्य बळकट  झाले आहे.

आयएनएस कुठार   हे स्वदेशी बनावटीचे मार्गदर्शक क्षेपणास्त्रने सुसज्ज जहाज  आहे. तर आयएनएस किल्तानहे  स्वदेशी बनावटीची पाणबुडीविरोधी शस्त्रसज्ज जहाज  आहे. दोन्ही जहाजे विशाखापट्टणम येथील भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्याचा  भाग आहेत, जी पूर्व नौदल कमांडच्या ध्वज अधिकारी  कमांडिंग-इन-चीफच्या ऑपरेशनल कमांड अंतर्गत कार्यरत आहेत.

***

S.Kane/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1976203) Visitor Counter : 85


Read this release in: English , Urdu , Hindi