आयुष मंत्रालय

देशभरात आयुर्वेद दिन मोठ्या उत्साहात साजरा


अणुऊर्जा, कीटकनाशके आणि प्रदूषणयुक्त वातावरणाच्या या युगात आयुर्वेद हे वरदान  : सर्बानंद सोनोवाल

Posted On: 10 NOV 2023 3:11PM by PIB Mumbai

 

अणुऊर्जा, कीटकनाशके आणि प्रदूषणयुक्त वातावरणाच्या या युगात आयुर्वेद हे वरदान आहे, असे केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आठव्या आयुर्वेद दिनानिमित्त बोलताना सांगितले. निरंतर प्रयत्नांमुळे आयुष मंत्रालयाने देशभरात आठ हजारांहून अधिक निरामय केंद्र स्थापन केली आहेत.आयुष क्षेत्राची सेवा अधिक बळकट करण्यासाठी आयुष ग्रीड प्रकल्प सुरू करण्यात आला आणि तो बळकट करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. दरवर्षी धन्वंतरी जयंतीला आयुर्वेद दिन साजरा केला जातो. दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने आयुर्वेद दिनाची ख्याती जगभर वाढली आहे. आयुर्वेदाच्या जागतिक विस्तारामुळे औषधी वनस्पतींच्या  लागवडीची गरज जगभरात झपाट्याने वाढत आहे, असे सोनोवाल यांनी सांगितले.

यावेळी आठव्या आयुर्वेद दिनानिमित्त आयुर्वेद दिनाचे सूक्ष्म संकेतस्थळ  तयार करण्यात आले असून  याला   जगभरातून सुमारे वीस कोटी लोकांचा प्रतिसाद  मिळाला आहे . आयुर्वेद दिनाच्या जागतिक मोहिमेचा संदेश 'एक आरोग्यासाठी आयुर्वेद' आणि जी -20 बैठकीची जागतिक संकल्पना  'वसुधैव कुटुंबकम' ने अशी अमिट छाप सोडली असून  संपूर्ण जग ते पाहत आहे, असे आपल्या अध्यक्षीय भाषणात सोनोवाल यांनी सांगितले.

आयुर्वेदिक औषधांचे सूक्ष्म  गुणधर्म समजून घेण्यासाठी आयआयटी, एम्स आणि सीएसआयआर सारख्या संस्था आयुषसोबत काम करत आहेत, असे आयुर्वेद दिनाच्या समारंभाला उपस्थित केंद्रीय आयुष राज्यमंत्री मुंजपारा महेंद्रभाई यांनी सांगितले.  इस्रोच्या (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) मदतीने देशभरातील औषधी वनस्पतींचे मॅपिंग केले जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार कार्यक्रमात आयुर्वेद क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार जाहीर करण्यात आला.वैद्य आर एम आव्हाड, वैद्य पी व्ही दमानिया, वैद्य एल महादेवन सरमा यांना हे विशेष सन्मान प्रदान करण्यात आले.

***

S.Kane/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1976164) Visitor Counter : 95