वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल 13 ते 16 नोव्हेंबर 2023 या कालावधीत सॅनफ्रान्सिस्कोच्या दौ-यावर जाणार, भारतीय प्रशांत आर्थिक चौकट (IPEF) आणि आशिया प्रशांत आर्थिक सहकार्य (APEC) च्या नेतृत्व स्तरावरील तसेच मंत्री स्तरावरील बैठकांमध्ये सहभागी होणार
Posted On:
10 NOV 2023 12:10PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयुष गोयल 13 ते 16 नोव्हेंबर 2023 या कालावधीत भारतीय प्रशांत आर्थिक चौकट (IPEF) आणि आशिया प्रशांत आर्थिक सहकार्य (APEC) यामध्ये नेतृत्व स्तरावरील तसेच मंत्री स्तरावरील विविध औपचारिक कामकाजाचा भाग असलेल्या बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी सॅनफ्रान्सिस्कोला भेट देणार आहेत. दोन्ही देशांमधील आर्थिक तसंच व्यापारी बंध आणि भागीदारी दृढ करण्यासाठी ते प्रतिष्ठित उद्योगपती , शिक्षण क्षेत्रातील नामवंत , अमेरिकेतील अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती त्यांच्याशी या भेटीत संवाद साधतील.
वाणिज्य आणि उद्योग मंत्री 13 आणि 14 नोव्हेंबर 2023 या कालावधीत तिसऱ्या वैयक्तिक स्तरावरील भारतीय प्रशांत आर्थिक चौकट (IPEF) मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतील. या बैठकीत वाटाघाटींच्या स्तरावर लक्षणीय प्रगती करणारी पावले टाकली जातील.
IPEF बैठकींशिवाय ते अमेरिकेचे वाणिज्य मंत्री, USTR आणि IPEF मधील सहभागी देशांचे मंत्रीगण यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. IPEF नेतृत्वस्तरावरील बैठकीला तसंच जागतिक पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक - IPEF गुंतवणूक चर्चासत्रातील बैठकीत 16 नोव्हेंबर 2023 रोजी मंत्री महोदय भारताचे प्रतिनिधित्व करतील.
आशिया प्रशांत आर्थिक सहकार्य या आर्थिक नेतेस्तरीय बैठक 15 आणि 16 नोव्हेंबर 2023 रोजी ते भारताचे प्रतिनिधित्व करतील. तिसाव्या आशिया प्रशांत आर्थिक सहकार्य या आर्थिक नेतेस्तरीय बैठक -2023 मध्ये भारताला अतिथी अर्थव्यवस्था म्हणून आमंत्रण आहे.
या भेटीत वाणिज्य आणि उद्योग मंत्री हे अमेरिकेच्या वाणिज्य मंत्री गियाना रायमोंडो , USTR कॅथरीन ताय आणि विविध क्षेत्र तसेच उद्योग प्रतिनिधी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. तंत्रज्ञान तसेच नवोन्मेष या क्षेत्रातील सहकार्य पुढील स्तरावर नेण्यासंदर्भात तसेच व्यापारातील अडचणी, गुंतवणूकीला प्रोत्साहन अशा गोष्टींवर मुख्यत्वे चर्चा करतील.
"भारत अमेरिका नवोन्मेष हस्तांदोलन उपक्रम" या संदर्भातील एका संयुक्त कार्यक्रमाला अमेरिकेच्या वाणिज्यमंत्री गियाना रायमोंडो यांच्याबरोबर ते सह-अध्यक्ष म्हणून सहभागी होतील.
क्रियाशील स्टार्टअप वातावरणाच्या संदर्भात दोन्ही बाजूंची प्रगती आणि सहकार्य तसेच सहकार्यात येणाऱ्या विशेष नियमावलीतील अडचणी आणि नव्याने आलेल्या तंत्रज्ञानातील रोजगार वाढ ही अनेक उद्दिष्टे या उपक्रमामागे आहेत.
गुंतवणूकदारांच्या गोलमेज बैठकीत इतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर द्विपक्षीय बैठकीत वाणिज्य आणि उद्योग मंत्री सहभागी होणार आहेत. विद्यार्थी नवउद्योजक, व्हेंचर कॅपिटलिस्ट आणि भारतीय नागरिकांच्या प्रतिनिधी अशा अनेक संबंधितांशी सुद्धा ते चर्चा करतील.
***
NM/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1976114)