निती आयोग
नीति आयोगाने शाश्वत भविष्यासाठी हरित विकास करारावर कार्यशाळेचे केले आयोजन
Posted On:
09 NOV 2023 8:31PM by PIB Mumbai
नीति आयोगाने आज नवी दिल्ली येथील हॉटेल ले मेरिडियन येथे "शाश्वत भविष्यासाठी हरित विकास करार" या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेची रचना हरित विकास कराराचा समावेश असलेल्या जी 20 नवी दिल्ली नेत्यांच्या घोषणापत्र (NDLD) च्या आधारावर करण्यात आली होती. हरित विकास करार सर्व राष्ट्रांना ऊर्जा, हवामान, पर्यावरण आणि आपत्ती लवचिकता संबंधित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांच्या प्रवासात मार्गदर्शन प्रदान करतो.
भारतातील हरित विकास कराराच्या अंमलबजावणीच्या धोरणांवर चर्चा करणे, जी 20 नवी दिल्ली नेत्यांच्या घोषणापत्राशी हा करार संरेखित करणे आणि हरित विकास करारामध्ये मांडलेल्या मार्गांच्या जागतिक प्रगतीसाठी भारताच्या नेतृत्वाच्या भूमिकेला प्रोत्साहन देणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता. या कार्यक्रमात विचारवंत, शैक्षणिक संस्था, उद्योग, राज्य सरकार आणि केंद्र सरकारसह देशभरातील भागधारक सहभागी झाले होते. तर सुमारे 4600 जण या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीमार्फत सामील झाले होते.
ऊर्जा मंत्रालयाचे सचिव पंकज अग्रवाल यांनी भारतातील हरित विकासाला पुढे नेण्यासाठी घेतलेल्या धोरणात्मक उपक्रमांची रूपरेषा सांगितली. यात उच्च कार्यक्षमतेच्या सौर पीव्ही मॉड्यूल्ससाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन (PLI) योजना, नवीकरणीय खरेदी दायित्वे आणि कार्बन क्रेडिट ट्रेडिंग योजना यांचा समावेश होता.
भारताने हरित विकास करारावर एकमत निर्माण करण्यासाठी अनेक आव्हानांवर मात केली असल्याचे जी 20 चे शेर्पा अमिताभ कांत यांनी अधोरेखित केले. हरित विकास करारामध्ये 2030 पर्यंत जागतिक नवीकरणीय क्षमतेत तिप्पट वाढ आणि हवामान वित्त अत्यंत जलद गतीने बिलीयनवरून ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढवणे यासारख्या महत्त्वपूर्ण महत्त्वाकांक्षा समाविष्ट आहेत यावरही त्यांनी भर दिला. भारताने ऊर्जा संक्रमण आणि हवामान कृतीवरील जागतिक चर्चेसाठी अजेंडा निश्चित केला आहे, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेदरम्यान विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी तीन स्वतंत्र सत्रे घेण्यात आली.
नीति आयोगाने नवी दिल्ली नेत्यांचे घोषणापत्र (NDLD) च्या प्रमुख विषयपत्रिकेवर आधारित संकल्पनात्मक दहा कार्यशाळांची मालिका आयोजित केली आहे. ज्यामुळे देशाच्या विकासाला आणि समृद्धीला चालना देण्यासाठी अंमलबजावणी धोरणे आणि योजना तयार केल्या जाऊ शकतात.
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1976021)
Visitor Counter : 125