कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

व्यावसायिक कोळसा खाणी लिलाव पूर्णपणे पारदर्शक, न्याय्य आणि कार्यपद्धतीवर आधारित - कोळसा मंत्रालय

Posted On: 08 NOV 2023 5:39PM by PIB Mumbai

 

वर्ष 2014 मध्ये 204 कोळसा खाणी रद्द केल्यानंतर, कोळसा खाणींचा लिलाव पारदर्शक यंत्रणेद्वारे आणि ऊर्जा आणि नियमन नसलेल्या क्षेत्रांसारख्या विविध वापरकर्त्यांसाठी केला जात असल्याचे कोळसा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. बंदिस्त कोळसा खाणींसाठी लिलाव-आधारित व्यवस्था फलद्रूप झाल्यामुळे आणि देशाच्या उत्पादनाला चालना देण्याच्या आणि कोळशाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने, 2020 मध्ये व्यावसायिक खाणकामासाठी सांगोपांग विचार करून भविष्यकालीन धोरण आणले गेले. या धोरणांतर्गत, व्यावसायिक कोळसा खाणकामाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आणि त्वरित निर्णय प्रक्रियेसाठी सचिव (परराष्ट्र व्यवहार विभाग), सचिव (कायदेशीर व्यवहार विभाग), सचिव (पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय) आणि सचिव (कोळसा) यांचा सदस्य म्हणून समावेश असलेली सचिवांची अधिकार प्राप्त समिती (ईसीओएस) स्थापन करण्यात आली.

व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावाच्या कार्यपद्धतीनुसार, एका खाणीसाठी दोनपेक्षा कमी तांत्रिकदृष्ट्या पात्र बोलीदार असल्यास, त्या खाणीचा लिलाव करण्याचा पहिला प्रयत्न रद्द केला जाईल आणि लिलावाचा दुसरा प्रयत्न सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने सुरू केला जाईल. तथापि, दुस-या प्रयत्नात पुन्हा एकच निविदा आली असल्यास, खाण वाटपाच्या संदर्भात योग्य निर्णय घेण्यासाठी प्रकरण सचिवांच्या अधिकारप्राप्त समितीकडे वर्ग केले जाईल. लिलावामधील पारदर्शकता, बोलीमधील तर्कसंगतता आणि खाण लिलावाच्या फेऱ्यांची संख्या या आधारावर लिलावाच्या दुसऱ्या प्रयत्नानंतर एकाच बोलीच्या आधारे आजमितीस 11 कोळसा खाणी वेगवेगळ्या बोलीदारांना ईसीओएस च्या मंजुरीने वाटप करण्यात आल्या आहेत. नमूद करण्याची बाब म्हणजे गेल्या सात फेऱ्यांमध्ये वारंवार लिलावाची संधी देऊनही अनेक कोळसा खाणींसाठी एकही निविदा प्राप्त झाली नाही.

S. No.

Name of the Coal Mine

State

Successful Bidder

Final Offer submitted by the bidder

Vesting/ Allocation Date

Tranches in which mine was before final Allocation

Tranches in which mine was subsequently put for auction

1

Kuraloi (A) North

Odisha

Vedanta Limited

15.25%

03-09-2021

Nil

1st round of commercial auction

2

Gondbahera Ujheni East

Madhya Pradesh

MP Natural Resources Private Limited

5.00%

10-10-2022

Nil

2nd round of commercial auction

3

Tokisud Block II

Jharkhand

Twenty First Century Mining Private Limited

5.00%

08-02-2023

Nil

2nd round of commercial auction

4

Ashok Karkatta Central

Jharkhand

Moonpie Metaliks Private Limited

6.50%

Vesting Order Not Yet Issued

Nil

3rd round of commercial auction

5

Kasta (East)

West Bengal

Jitusol Developers Private Limited

5.00%

12-12-2022

Nil

3rd round of commercial auction

6

Marki Barka

Madhya Pradesh

Birla Corporation Limited

6.00%

17-01-2023

1st

3rd round of commercial auction

7

Barra

Chhattisgarh

Bharat Aluminium Company Limited

5.00%

12-12-2022

2nd

3rd round of commercial auction

8

Maiki North

Madhya Pradesh

Maiki South Mining Pvt. Ltd.

5.00%

12-12-2022

Nil

3rd round of commercial auction

9

Alaknanda

Odisha

Rungta Sons Private Limited

5.00%

12-12-2022

2nd

4th round of commercial auction

10

Choritand Tiliaya

Jharkhand

Rungta Metals Private Limited

11.25%

08-06-2023

1st, 2nd & 4th

5th round of commercial auction

11

Sitanala

Jharkhand

JSW Steel Limited

5.00%

08-06-2023

3rd & 4th

5th round of commercial auction

वर निर्देशित लिलाव केलेल्या 11 कोळशाच्या खाणींपैकी केवळ एक कोळसा खाण म्हणजे गोंडबहेरा उजनी पूर्व कोळसा खाण अदानी समुहाने अर्थात एम पी नॅचरल रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेडने यशस्वीरित्या जिंकली आहे. गोंडबहेरा उजेनी पूर्व खाणीचा लिलाव ज्या महसूल वाटा टक्केवारीत झाला होता त्याच टक्केवारीत इतर खाणींचाही यशस्वीपणे लिलाव करण्यात आला आहे.

व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावाचे हे प्रचंड यश आहे. 2020 मध्ये व्यावसायिक खाणकामाचा पहिला लिलाव झाल्यापासून, तीन वर्षांच्या अल्प कालावधीत व्यावसायिक कोळसा खाणकामांतर्गत, सात टप्प्यांत एकूण 91 कोळसा खाणींचा यशस्वी लिलाव करण्यात आला आहे. या 91 कोळसा खाणींपैकी नऊ कोळसा खाणींना सर्व परवानग्या मिळाल्या असून पाच कोळसा खाणींनी उत्पादन सुरू केले आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये व्यावसायिक खाणींमधून 7.2 दशलक्ष टन (मेट्रिक टन) उत्पादन झाले.

याशिवाय, कॅव्हल मायनिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि अदानी समूह यांच्यात कोणताही परस्परसंबंध स्थापित झालेला नाही. तसेच, निविदा दस्तऐवजातील तरतुदींनुसार, संलग्नक म्हणजे जो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे: (1) अशा बोलीदारावर नियंत्रण ठेवणारी व्यक्ती आहे; (२) अशा बोलीदाराद्वारे नियंत्रित आहे; (3) त्याच व्यक्तीद्वारे नियंत्रित केले जाते, जो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अशा बोलीदाराला नियंत्रित करतो; किंवा (4) अशा बोलीदाराची सहयोगी कंपनी आहे. या प्रकरणात, कॅव्हल मायनिंग प्रायव्हेट लिमिटेड ही अदानी समूहाची संलग्न कंपनी आहे हे स्थापित केले जाऊ शकत नाही. शिवाय, चुकीचे तपशील आढळून आल्यास लिलाव प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर निविदा दस्तऐवजाच्या कलम 5.12 नुसार योग्य ती कारवाई करण्याचा अधिकार कोळसा मंत्रालयाकडे आहे.

***

R.Aghor/V.Joshi/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1975739) Visitor Counter : 98


Read this release in: Urdu , English , Hindi , Tamil