कोळसा मंत्रालय
विशेष मोहीम 3.0 च्या "मोकळी जागा " श्रेणीत कोळसा मंत्रालयाने पटकावले सर्वोच्च स्थान
प्रविष्टि तिथि:
07 NOV 2023 5:20PM by PIB Mumbai
कोळसा मंत्रालयाने ही विशेष मोहीम उल्लेखनीय यश संपादित करत पूर्ण केली आहे.
31.10.2023 रोजी संपलेल्या विशेष मोहिम 3.0 दरम्यान मंत्रालयाच्या उपलब्धी खालीलप्रमाणे आहेतः
(i) सार्वजनिक तक्रारी, पंतप्रधान कार्यालय संदर्भ, मुख्यमंत्री कार्यालय संदर्भ आणि एकात्मिक विपणन संप्रेषण (IMC) च्या निपटाऱ्यामध्ये 100% लक्ष्य गाठले.
(ii) जागा मोकळी केली - 65,88,878 चौ.फू. जागा मोकळी करत कोळसा मंत्रालय भारत सरकारमधील सर्व मंत्रालये आणि विभागांमध्ये 'स्पेस फ्रीड ' श्रेणी अंतर्गत सर्वोच्च स्थानावर आहे.
(iii) मंत्रालय आणि त्याच्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाद्वारे पूर्वतयारी टप्प्यात निश्चित केल्या गेलेल्या 763 ठिकाणांच्या सुरुवातीच्या उद्दिष्टाला मागे टाकत 956 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
(iv) या मोहिमेत कोळसा मंत्रालयाच्या पुढील दोन सर्वोत्तम पद्धती अधोरेखित केल्या गेल्या आहेत : "प्लास्टिक दानव" (NCL) आणि "कबाड से कलाकृती" (SECL) अर्थात कचऱ्यापासून कलाकृती.
(v) 8424 मेट्रिक टन भंगाराच्या विल्हेवाटीतून कमावला 33.71 कोटी रुपयांचा महसूल ('भंगारातून कमावलेला महसूल' श्रेणीत कोळसा मंत्रालय चौथ्या स्थानावर आहे)
(vi) 1,39,969 प्रत्यक्ष फायली तर 1,05,369 ई-फाईलींचे पुनरावलोकन केले गेले आणि एकूण 69227 फाईल्सचा निपटारा करण्यात आला किंवा त्या बंद करण्यात आल्या.
2. भंगार आणि कचरऱ्याची विल्हेवाट लावल्याने मोकळी झालेली जागा वृक्षारोपण, उद्यान निर्मिती, सुशोभीकरण, वाहनतळासाठी विस्तीर्ण जागा, प्रशस्त कार्यालयीन बैठक व्यवस्था, साठवणूक यासारख्या विविध कारणांसाठी वापरली जात आहे.
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1975473)
आगंतुक पटल : 133