रसायन आणि खते मंत्रालय
केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ नेदरलँड्समधील दुसऱ्या जागतिक स्थानिक उत्पादन मंचात झाले सहभागी
भारतीय फार्मास्युटिकल कंपन्या उच्च-गुणवत्तेच्या औषधांच्या विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या पुरवठादार बनल्या आहेत, ज्यामुळे जगभरातील आरोग्य सेवांमध्ये लक्षणीय सुधारणा होत आहे : भगवंत खुबा
Posted On:
07 NOV 2023 12:10PM by PIB Mumbai
केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाने आज नेदरलँड्समधील हेग येथे आयोजित दुसऱ्या जागतिक स्थानिक उत्पादन मंच (WLPF) मध्ये भाग घेतला. ही बैठक 6 ते 8 नोव्हेंबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. जागतिक स्थानिक उत्पादन मंच म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने औषधे आणि इतर आरोग्य तंत्रज्ञानाची उपलब्धता वाढवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेले व्यासपीठ आहे.
ही बैठक निदानात्मक, प्रतिकारक उपायांच्या विकास आणि निर्मितीमधील अनुभव, आव्हाने आणि यश सामायिक करण्याची महत्त्वपूर्ण संधी प्रदान करते, असे खुबा यांनी आपल्या भाषणात सांगितले. या महत्त्वपूर्ण साधनांमध्ये शाश्वत आणि न्याय्य प्रवेश सक्षम करणार्या नाविन्यपूर्ण पध्दती ओळखण्यासाठी आपण आणखी सहकार्य केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
21 व्या शतकात कोविड-19 सारखी महामारी आणि साथीचे रोग वारंवार आढळून आले. यामुळे जागतिक पुरवठा साखळीतील कमतरता आणि दर्जेदार वैद्यकीय उपायांच्या उपलब्धतेत असमानता दिसून आली, असेही ते म्हणाले. अशा अडचणींवर नवीन उपाय शोधण्यात समानता प्राप्त करण्यासाठी अनेक क्षेत्रांमधील सहकार्याचे महत्त्व जगभरातील देशांच्या लक्षात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
भारतातील फार्मास्युटिकल उद्योग हा जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक असून त्यामुळेच भारताला 'जगाची फार्मसी' ही पदवी मिळाली आहे, अशी माहिती खुबा यांनी दिली. भारतीय फार्मास्युटिकल कंपन्या उच्च-गुणवत्तेच्या औषधांच्या विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या पुरवठादार बनल्या आहेत, त्यामुळे जगभरातील आरोग्य सेवांमध्ये लक्षणीय सुधारणा होत आहे, असेही ते म्हणाले. भारत जागतिक लस पुरवठ्यापैकी सुमारे 60% लसी पुरवतो तर सुमारे 20-22% जेनेरिक औषधांची निर्यात करतो आणि 200 हून अधिक देशांना औषध निर्यातीद्वारे सेवा देतो, असे त्यांनी सांगितले.
"सध्या, स्थानिक उत्पादनाला महत्त्वपूर्ण आव्हानांचा सामना करावा लागत आहे कारण ते संशोधनाला प्रत्यक्ष उत्पादन विकासामध्ये साकार करण्याच्या गंभीर समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे ते म्हणाले. तंत्रज्ञान हस्तांतरणाचा अभाव हा एक मोठा अडथळा आहे. प्रमाणीकरण, उत्पादन आणि वितरण हे देखील मोठे अडथळे असून नाविन्यपूर्ण आरोग्यसेवा तंत्रज्ञान बाजारात आणण्यासाठी कार्यक्षम समन्वय आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. नियामक प्रणालींमध्ये क्षमता निर्माण करणे आणि कुशल तांत्रिक मनुष्यबळाची निर्मिती हे आवश्यक घटक आहेत.” असे त्यांनी सांगितले.
आपल्या या भेटीदरम्यान खुबा यांनी सुरीनामचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. अमर एन. रामाधीन यांचीही भेट घेतली आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेबद्दल चर्चा केली. श्रीगंधा हॉलंड कन्नड बालगा यांनी आयोजित केलेल्या कन्नड राज्योत्सव 2023 समारंभात भाग घेण्यासाठी खुबा यांनी नेदरलँड्समधील आइंडहोवन शहराला देखील भेट दिली.
***
N.Meshram/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1975335)
Visitor Counter : 117