निती आयोग
विकासाचे इंजिन म्हणून “भारतीय विकास मॉडेल” या विषयावर नीती आयोगाकडून कार्यशाळेचे आयोजन
अमृत काळादरम्यान भारतीय आर्थिक मॉडेलच्या (आयडीएम) वाटचालीत अंमलबजावणीसह कृतीयोग्य परिणाम सुचवण्याचा कार्यशाळेचा उद्देश
Posted On:
06 NOV 2023 5:51PM by PIB Mumbai
नीती आयोगाने उद्या 7 नोव्हेंबर 2023 (मंगळवार) रोजी नवी दिल्लीतील हॉटेल ले मेरिडियन येथे ‘भारतीय विकास मॉडेल’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ही कार्यशाळा 10 विषय आधारित सहयोगी कार्यशाळांच्या मालिकेचा भाग असून जी G20 नवी दिल्ली घोषणापत्रामध्ये (एनडीएलडी) चर्चा केलेल्या विविध विषयांवर आयोजित केली जात आहे.
ही कार्यशाळा विषय तज्ञ, विचारवंत तज्ज्ञ गटाचे प्रतिनिधी, शैक्षणिक आणि इतर भागधारकांसाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल. अमृत काळाच्या कालमर्यादेत मध्यम-उत्पन्नाचा दर्जा प्राप्त करण्यासाठी भारतासाठी सर्वसमावेशक परिचालन धोरण विकसित करण्यासाठी आणि प्रगतीच्या मार्गांची रूपरेषा तयार करण्याच्या मार्गांवर कार्यशाळेत चर्चा केली जाईल. या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी उत्तरदायी घटक ओळखणे आणि प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी टप्पे स्थापित करणे हे याचे उद्दिष्ट आहे. हे व्यासपीठ जे आपल्या नागरिकांच्या कल्याणावर सातत्याने लक्ष केंद्रित करून विविध विचारधारा जोडणाऱ्या आपल्या आर्थिक विकास मॉडेलच्या विविध पैलूंचे परीक्षण करेल .
खालील सत्रांमध्ये नमूद केलेल्या विस्तृत विषयांखाली चर्चा आयोजित केली जाईल:
1) भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचा दृष्टीकोन
2) ग्राम विकास आणि कृषी
3) पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास
4) सर्वसमावेशक भारत आणि सामाजिक विकास
1 नोव्हेंबर 2023 ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दहा सहयोगी विषय आधारित कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत.कार्यशाळांच्या विषयांमध्ये जी20 ते जी21, विकासासाठी डेटा , पर्यटन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, शाश्वत विकास, उद्दिष्टे, व्यापार, भारतीय विकास मॉडेल, महिलांच्या नेतृत्वाखालील विकास, बहुस्तरीय विकास बँकांमध्ये सुधारणा आणि हवामान वित्त आणि हरित विकास यांचा समावेश आहे.
***
S.Patil/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1975226)
Visitor Counter : 118