कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत मास्टर ट्रेनर्स आणि ऍसेसर्स कार्यक्रमाच्या प्रशिक्षणाचा प्रारंभ


एमएसडीई अंतर्गत 6 ते 10 नोव्हेंबर 2023 दरम्यान राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्थेत (एनआयईएसबीयुडी) 5 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 06 NOV 2023 6:44PM by PIB Mumbai

 

पीएम विश्वकर्मा योजनेच्या अंमलबजावणीच्या दिशेने एक धोरणात्मक पाऊल म्हणून, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने (एमएसडीई) आज पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत निवडक व्यवसायांमध्ये कारागीर आणि शिल्पकार समुदायाला सक्षम करण्यासाठी मास्टर ट्रेनर्स आणि ऍसेसर्स कार्यक्रमाचे प्रशिक्षण सुरू करण्याची घोषणा केली.

6 ते 10 नोव्हेंबर 2023 या कालावधीत राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्थेत (एनआयईएसबीयुडी) आयोजित या पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमात दिल्ली, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड यासह 10 विविध राज्यांतील 41 मास्टर ट्रेनर्सना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

मास्टर ट्रेनर्सची पहिली तुकडी पुढील व्यवसायांची पूर्तता करेल: न्हावी (नाई), शिंपी (दरझी), गवंडी (राजमिस्त्री), सुतार (सुथार/बढई), बाहुली आणि खेळणी बनवणारा (पारंपरिक), आणि लोहार (लोहार).

मास्टर ट्रेनर्स प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश या मास्टर ट्रेनर्सना आधुनिक तंत्रज्ञान कौशल्ये आणि उद्योजकीय ज्ञानाने सुसज्ज करणे हा आहे. सहभागींना उद्योजकीय क्षमता, व्यवसाय योजना तयारी, सरकारी समर्थन परिसंस्था, आर्थिक साक्षरता, डिजिटल आणि सोशल मीडिया विपणन, ब्रँडिंग आणि विपणन यावर प्रशिक्षण मिळेल. याव्यतिरिक्त, मास्टर ट्रेनर्सना त्यांच्या कौशल्य वर्धनासाठी आणि समकालीन पद्धतींशी जुळवून घेण्यासाठी आधुनिक उपकरणांचे किट प्रदान केले जाईल.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आज कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव अतुल कुमार तिवारी यांच्या हस्ते झाले.

पीएम विश्वकर्मा योजना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्रे आणि ओळखपत्रांद्वारे ओळख, कौशल्य पडताळणीद्वारे कौशल्य वर्धन, मूलभूत कौशल्य, प्रगत कौशल्य प्रशिक्षण, उद्योजकीय ज्ञान, 15,000 रुपयांपर्यंत टूलकिट प्रोत्साहन, पतपुरवठा पाठबळ 3,00,000 रुपयांपर्यंत, आणि डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन सुनिश्चित करते. हा कार्यक्रम राष्ट्रीय विपणन समिती (एनसीएम) द्वारे विपणन आणि ब्रँडिंग समर्थन देखील प्रदान करेल.

अधिक माहितीसाठी कृपया www.pmvishwakarma.gov.in ला भेट द्या. कोणत्याही शंकांच्या निरसनासाठी कारागीर आणि शिल्पकार 18002677777 वर कॉल करू शकतात किंवा pm-vishwakarma[at]dcmsme[dot]gov[dot]in वर ईमेल करू शकतात.

***

S.Patil/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1975221) Visitor Counter : 151