कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुख्य माहिती आयुक्त आणि दोन नव्या  माहिती आयुक्तांनी स्वीकारला पदभार

प्रविष्टि तिथि: 06 NOV 2023 7:19PM by PIB Mumbai

 

केंद्रीय माहिती आयोगात मुख्य माहिती आयुक्त म्हणून एस हीरालाल समरिया यांची  नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज पदभार स्वीकारला. केंद्रीय माहिती आयोगात आयोजित शपथविधी समारंभात त्यांनी माहिती आयुक्त आनंदी रामलिंगम आणि   विनोद कुमार तिवारी यांना पदाची शपथ दिली.

आनंदी रामलिंगम या  केंद्रीय माहिती आयोगात माहिती आयुक्त म्हणून रुजू होण्यापूर्वी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या  अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होत्या . त्या  इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकीमध्ये बीई (ऑनर्स) पदवीधर  आहेत. त्यांना  खरेदी, संकल्पना, डिझाइन आणि विकास आणि उपकरणांचे उत्पादन, तांत्रिक बाबी क्षेत्राचा आणि विविध प्राधिकरणांशी समन्वय आणि माहिती अधिकाराशी संबंधित  प्रकरणे हाताळण्याचा  अनुभव आहे. प्रशासन चालवण्याच्या क्षेत्रात त्यांचे विशेष नैपुण्य आहे.

विनोद कुमार तिवारी हे भारतीय वन सेवा अधिकारी, केंद्रीय माहिती आयोगात माहिती आयुक्त म्हणून रुजू होण्यापूर्वी, हिमाचल प्रदेश वन विभाग, सिमला येथे प्रमुख वनसंरक्षक-सह-प्रधान मुख्य वनसंरक्षक या पदावर कार्यरत  होते. त्यांनी विज्ञान विषयात पदवी आणि भूविज्ञानात विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. प्रशासन चालवण्याच्या क्षेत्रात त्यांचे विशेष नैपुण्य आहे.

***

S.Patil/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1975216) आगंतुक पटल : 2393
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi