निती आयोग
नीती आयोग जी-20 नवी दिल्ली घोषणापत्रातल्या “शाश्वत विकास उद्दिष्टांवर गतीमान प्रगती” या विषयावर कार्यशाळा आयोजित करणार
Posted On:
05 NOV 2023 2:49PM by PIB Mumbai
नीती आयोग उद्या 6 नोव्हेंबर 2023 (सोमवार) रोजी नवी दिल्लीत डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र इथे “देशांतर्गत अंगीकार आणि अंमलबजावणीसाठी शाश्वत विकास उद्दिष्टांवर गतीमान प्रगती” या विषयावर कार्यशाळा आयोजित करत आहे. मनुष्यबळ विकास संस्था (IHD) आणि सामाजिक आणि आर्थिक विकास केंद्र (CSEP) यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित केली जात आहे. जी-20 नवी दिल्ली घोषणापत्राच्या अनुषंगाने 10 संकल्पनांबाबत झालेल्या चर्चेनुसार नियोजित जी-20 सहाय्यक संकल्पनाधारित कार्यशाळांच्या मालिकेतील ही पाचवी कार्यशाळा असेल.
विषय तज्ञ, विचारवंतांचे प्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि इतर संबंधित भारतातील शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी आखलेल्या प्रमुख विषयांबाबत चर्चा करतील, "पोषण, आरोग्य आणि शिक्षण: मानवी भांडवल आणि समृद्धीचे मुख्य कार्यवाहक " या शीर्षकाने होणाऱ्या उद्घाटनाच्या पूर्ण सत्रानंतर खाली नमूद केलेले तीन विभाग असतील, ज्यात भारतातील शाश्वत विकास उद्दिष्टांबाबत प्राधान्यक्रमानुसार सखोल चर्चा होईल
उपासमार आणि कुपोषण निर्मुलन करणे, सर्वांसाठी चांगले आरोग्य सुनिश्चित करणे, दर्जेदार शिक्षण देणे:
ही कार्यशाळा मिश्र पद्धतीने आयोजित केली जात आहे. सुमारे 40 विचारवंत आणि विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे वरिष्ठ अधिकारी आणि 500 महत्त्वाकांक्षी घटक देखील यात आभासी पद्धतीने सहभागी होणार आहेत.
जी-20 नवी दिल्ली घोषणापत्राशी संरेखित करून भारतातील शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अंमलबजावणीची कार्यवाही पुढे नेणे आणि या महत्वपूर्ण विकास उद्दिष्टांच्या जागतिक स्तरावरच्या प्रसारासाठी भारताच्या वचनबद्धतेला प्रोत्साहन देणे हे कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
***
N.Chitale/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1974895)
Visitor Counter : 135