सांस्कृतिक मंत्रालय
मेट्रो स्थानकांपासून प्रधानमंत्री संग्रहालयापर्यंत शटल बस सेवा
Posted On:
03 NOV 2023 6:34PM by PIB Mumbai
प्रधानमंत्री संग्रहालय अभ्यागतांच्या सोयीसाठी विविध पर्यायांचा निरंतर धांडोळा घेत आहे. अभ्यागतांना मेट्रो स्थानके आणि तीन मूर्ती येथे असलेल्या संग्रहालयादरम्यान कनेक्टिव्हिटीच्या समस्या येत असल्याचे निदर्शनास आले. परिवहन विभागाच्या व्यवस्थापनाच्या विनंतीवरून, राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकारने केंद्रीय सचिवालय आणि उद्योग भवन जवळील मेट्रो स्थानक ते प्रधानमंत्री संग्रहालय यांना जोडणाऱ्या परिघात समर्पित बस सेवा चालवण्यास सहमती दर्शवली आहे. याला मिळणारा प्रतिसाद पाहून लवकरच लोककल्याण मार्गावरील मेट्रोही जोडली जाईल. अशा प्रकारे या शटल बस सेवेद्वारे संग्रहालयाला भेट देणारे अभ्यागत आपापल्या ठिकाणाहून ये-जा करू शकतात. तिकीट असलेली ही बस सेवा प्रधानमंत्री संग्रहालय येथून तासागणिक असेल. बसमध्ये चढताना संग्रहालयाचे तिकीट उपलब्ध करून देता येईल का, याचीही चाचपणी केली जात आहे. 1 नोव्हेंबर 2023 पासून बससेवा सुरू झाली आहे.
14 एप्रिल 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले हे संग्रहालय लहान मुले, विद्यार्थी, ज्येष्ठ संशोधक आणि देशी तसेच परदेशी पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. संग्रहालयाला दररोज सुमारे 2000 अभ्यागत भेट देतात. उदघाटन झाल्यापासून या संग्रहालयाला भेट देणाऱ्यांची संख्या लवकरच 7 लाख होईल.
प्रधानमंत्री संग्रहालयात एक लोकप्रिय लाईट अँड साउंड शो देखील आहे जो भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या अंतराळ कार्यक्रमाचा उल्लेखनीय प्रवास उलगडतो. यात चांद्रयानच्या यशाचा समावेशही आहे. भारतातील महिला वॉरियर्स (वीरांगना) वर दुसरा लाईट अँड साउंड शो देखील नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे.
***
S.Kakade/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1974568)
Visitor Counter : 96