उपराष्ट्रपती कार्यालय

“शांतता हा पर्याय नाही. तर हा एकमेव मार्ग आहे" - उपराष्ट्रपतींचे ठाम प्रतिपादन


माणेकशॉ सेंटर येथे आयोजित चाणक्य संरक्षण संवाद - 2023 ला उपराष्ट्रपतींनी  केले संबोधित

Posted On: 03 NOV 2023 2:27PM by PIB Mumbai

 

सतर्क आणि सुसज्ज असतानाही विचारधारा, ऍडव्होकसी , पोहोच , अनुनय  आणि संवाद यांचा समावेश करून बहुआयामी दृष्टिकोनातून शांतता प्राप्त करणे आणि टिकवून ठेवण्याचे सर्वोच्च महत्त्व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज अधोरेखित केले. "युद्धासाठी सुसज्ज असणे  हा शांततेचा मार्ग आहे," असेही त्यांनी नमूद केले.

कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, क्वांटम, सेमी-कंडक्टर, बायो-टेक, ड्रोन आणि हायपरसोनिक्स सारख्या  तंत्रज्ञानाच्या उदयावरही उपराष्ट्रपतींनी प्रकाश टाकला आणि या तंत्रज्ञाने युद्धाचे संपूर्ण स्वरुप पालटले असल्याचे सांगितले. "या क्षेत्रातील पराक्रम आणि प्रभुत्वच भविष्यातील सामरिक सामर्थ्य असलेले देश आणि नसलेले देश निश्चित करेल." यावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भर दिला.

नवी दिल्लीतील माणेकशॉ सेंटर येथे आयोजित चाणक्य संरक्षण संवाद-2023 ला संबोधित करताना, जागतिक सुरक्षा आणि शांततेसमोर असलेल्या समकालीन आव्हानांचे विश्लेषण करण्यासाठी या विचार मंचाच्या संकल्पनेबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी लष्कराचे अभिनंदन केले. दक्षिण आशिया आणि हिंद प्रशांत क्षेत्रातील सुरक्षाविषयक गुंतागुंतीच्या सखोल विश्लेषणासाठी चाणक्य संरक्षण संवाद हे एक उपयुक्त व्यासपीठ ठरेल, आणि परिणामस्वरुप या प्रदेशातील सामूहिक सुरक्षा उपायांसाठी मार्ग मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आज राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे अपरिमित वैशिष्ट्ये आणि क्षमतांचे एकत्रीकरण आहे - सैन्य हा त्याचा केवळ एक भाग आहे" हे उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले. "एक मजबूत गतिशील क्षमता  तयार करण्यासाठी विविध घटकांनी एकत्र येणे आवश्यक आहे" यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला. तसेच सध्याच्या वातावरणात समर्पक ठरू शकतील असे संकल्प शोधण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.

***

S.Kakade/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1974524) Visitor Counter : 75