कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभागाद्वारे 1 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान 2.0 सुरू


निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभागाचे सचिव व्ही श्रीनिवास, अतिरिक्त सचिव संजीव नारायण माथुर आणि संचालक रुचिर मित्तल आणि प्रमोद कुमार यांनी आज एसबीआय ने त्यांच्या नवी दिल्लीतील संसद मार्गावरील शाखेत आयोजित केलेल्या डीएलसी शिबिराला दिली भेट

भारतातील सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 100 शहरांमध्ये 500 ठिकाणी देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान 2.0 चे आयोजन

Posted On: 02 NOV 2023 7:36PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांची जीवनसुलभतावाढवण्यासाठी, निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभाग डिजिटल जीवन प्रमाणपत्र (डीएलसी) म्हणजेच जीवन प्रमाण चा मोठ्या प्रमाणावर प्रचार करत आहे. 2014 मध्ये, बायोमेट्रिक उपकरणांचा वापर करून डीएलसी सादर करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर, विभागाने आधारडेटाबेसवर आधारित फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान प्रणाली विकसित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणासोबत काम केले, ज्याद्वारे कोणत्याही अँड्रॉइड आधारित स्मार्ट फोनवरून हयातीचा दाखला सादर करणे शक्य होईल.

50 लाख निवृत्तिवेतनधारकांचे उद्दिष्ट ठेवून 17 निवृत्तीवेतन वितरण बँका, मंत्रालये/विभाग, पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशन, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या सहकार्याने 1 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत देशभरातील 100 शहरांमधील 500 ठिकाणी राष्ट्रव्यापी मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

देशव्यापी मोहिमेअंतर्गत निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभागाचे सचिव व्ही श्रीनिवास, अतिरिक्त सचिव संजीव नारायण माथुर आणि संचालक रुचिर मित्तल आणि प्रमोद कुमार यांनी 02 नोव्हेंबर, 23 रोजी एसबीआय ने त्यांच्या नवी दिल्लीतील संसद मार्गावरील शाखेत आयोजित केलेल्या डीएलसी शिबिराला भेट दिली. फेस ऑथेंटिकेशन डीएलसी मोड वापरून मोठ्या संख्येने निवृत्तिवेतनधारकांनी त्यांचा हयातीचा दाखला सादर केला. सचिवांनी निवृत्तीवेतनधारकांशी संवाद साधला आणि फेस ऑथेंटिकेशन डीएलसीच्या वापरावर त्यांचा अभिप्राय जाणून घेतला. जीवन प्रमाण अॅपची कार्यक्षमता तपासण्यासाठी अतिरिक्त सचिवांनी स्वतःच अनेक निवृत्तीवेतन धारकांचे चेहेरा प्रमाणीकरण केले आणि त्यांना जीवन प्रमाणपत्र काढून दिले. मूलभूत स्तरावर केलेल्या परीक्षणातून असे दिसून आले आहे की मोहिमेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी या अॅपचे कार्य अत्यंत सुरळीतपणे सुरु आहे. स्टेट बँकेने यावेळी देशभरातील 51 शहरांतील शाखांमध्ये राबवल्या जात असलेल्या या अभियानाबाबतचा अभिप्राय दिला. युआयडीएआयचे पथक अत्यंत उत्कृष्ट तांत्रिक पाठबळ पुरवत आहे असे स्टेट बँकेने कळवले आहे.

माजी सैनिक लीग निवृत्तीवेतन धारक  कल्याण संघटनेने देखील डीएलसी सादर करण्यासंदर्भात निवृत्तीवेतन धारकांसाठी आयोजित शिबिरांबद्दल त्यांचे अभिप्राय कळवले. या संघटनेच्या संलग्न संस्था देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये डीएलसी शिबिरांचे आयोजन करत आहेत.

निवृत्तीवेतन धारकांचे जीवनमान अधिक सुलभ होईल याची सुनिश्चिती करण्यासाठी बँका तसेच निवृत्तीवेतन धारक कल्याण संघटनांनी सुरु केलेल्या प्रयत्नांची सचिवांनी प्रशंसा केली आहे. निवृत्तीवेतन धारकांना मोठ्या प्रमाणात या मोहिमेचा लाभ होत आहे याचा त्यांनी उल्लेख केला. ऑक्टोबर महिन्यापासून वय वर्षे 80 आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या निवृत्तीवेतनधारकांनी त्यांची डिजिटल स्वरूपातील जीवन प्रमाणपत्रे सादर करायला सुरुवात केली आहे. या अभियानाच्या पहिल्या दिवसाच्या अखेरीला, 815732 निवृत्तीवेतनधारकांनी त्यांची जीवन प्रमाणपत्रे डिजिटल पद्धतीने सादर केली असून त्यापैकी 181712 जणांनी चेहेरा प्रमाणीकरण प्रणाली तर उर्वरित लोकांनी बायोमेट्रिक पद्धतीने डीएलसी सादर केले.

देशभरात आयोजित सर्व शिबिरांमध्ये निरीक्षणासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करून केंद्रीय निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग या अभियानावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

***

S.Patil/V.Joshi/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1974310) Visitor Counter : 153


Read this release in: English , Urdu , Hindi