निती आयोग
शाश्वत विकास उद्दिष्टांवरील प्रगतीला चालना देणाऱ्या विकासासाठी डेटा (D4D) वापरावर नीती आयोगाद्वारे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
विकासासाठी डेटा वापराच्या जी 20 तत्त्वांचे औचित्य, व्याप्ती आणि अंमलबजावणी यावर चर्चा
Posted On:
02 NOV 2023 6:02PM by PIB Mumbai
शाश्वत विकास उद्दिष्टांवरील प्रगतीला चालना देणाऱ्या विकासासाठी डेटा (D4D) वापर या संकल्पनेवर नीती आयोगाने उद्या नवी दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेस मध्ये कार्यशाळेचे आयोजन केले आहे. जी 20 नवी दिल्ली जाहीरनाम्यावर (एनडीएलडी) चर्चा करण्यासाठी नीती आयोगाद्वारे भरवण्यात येणाऱ्या वैविध्यपूर्ण पूरक संकल्पनात्मक कार्यशाळांच्या शृंखलेतील ही दुसरी कार्यशाळा आहे.
भारताच्या संदर्भात विकासासाठी डेटा (D4D) वापराच्या जी 20 तत्वांचे औचित्य, व्याप्ती आणि अंमलबजावणी यावर चर्चा करण्यासाठी ही कार्यशाळा एक मंच म्हणून काम करेल. या एकदिवसीय कार्यशाळेत मध्यवर्ती संकल्पनेशी प्रामुख्याने निगडित कार्य करणाऱ्या प्रमुख विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञांना एकत्र आणले जाईल. ही कार्यशाळा "शाश्वत विकास उद्दिष्टांवरील प्रगतीला चालना देणाऱ्या विकासासाठी डेटा (D4D) वापर" संदर्भात पुढील उपाययोजनांवर दृष्टिकोन मांडून आगामी राष्ट्रीय कार्यशाळेसाठी आवश्यक योगदान देईल.
कार्यशाळेत खालील संकल्पनांवर चार सत्रे असतील.
शाश्वतता:
उच्च-गुणवत्तेचा डेटा आणि शाश्वत डेटा पायाभूत सुविधा वाढवणे, शाश्वत विकासासाठी डेटा-माहितीपूर्ण दृष्टिकोनांना प्रोत्साहन देणे.
समावेशन:
स्त्री-पुरुष असमानता आणि डेटा असमानता दूर करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करून, विकासाच्या उद्देशांसाठी डेटाच्या सर्वसमावेशक वापराला चालना देऊन डिजिटल दरी दूर करणे.
तंत्रज्ञान आणि वित्त:
विकास उपक्रमांची प्रगती आणि परिणामकारकता वाढविण्यासाठी तंत्रज्ञान सहाय्यास प्रोत्साहन देताना अतिरिक्त आर्थिक पाठबळ मिळवणे.
क्षमता निर्माण:
व्यक्ती आणि संस्थांची क्षमता वाढवणे, सहयोगी प्रयत्नांना चालना देणे आणि शाश्वत विकासासाठी डेटा-धारित उपक्रमांच्या प्रभावीतेला चालना देण्यासाठी धोरणात्मक भागीदारी वाढवणे.
अशा दहा पूरक संकल्पनात्मक कार्यशाळा 1 नोव्हेंबर 2023 ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत आयोजित केल्या जात आहेत. कार्यशाळांच्या संकल्पनांमध्ये जी 20 ते जी 21, विकासासाठी डेटा, पर्यटन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, शाश्वत विकास उद्दिष्टे, व्यापार, भारतीय विकास मॉडेल, महिला नेतृत्व विकास, बहुउद्देशीय विकास बँक सुधारणा आणि हवामान वित्त आणि हरित विकास यांचा समावेश आहे.
***
S.Patil/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1974297)
Visitor Counter : 117