संरक्षण मंत्रालय

डीआरडीओ तर्फे उच्च ऊर्जा आणि विशेष पदार्थांसंबंधी 18व्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

Posted On: 02 NOV 2023 5:57PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली 02 नोव्हेंबर 2023

देशातील संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) पुणे स्थित उच्च ऊर्जाधारक पदार्थ संशोधन प्रयोगशाळेने (एचईएमआरएल) रशिया येथील टॉम्स्क स्टेट युनिव्हर्सिटी आणि फेडरल रिसर्च अँड प्रोडक्शन सेंटरच्या सहयोगाने उच्च ऊर्जा आणि विशेष पदार्थसंबंधी (एचईएमएस-2023)18 व्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. पुण्यात पाषाण येथील डॉ.एपी.जे.अब्दुल कलाम डीआरडीओ गोल्डन ज्युबिली सभागृहात आज आणि उद्या म्हणजे 2 आणि 3 नोव्हेंबर 2023 रोजी ही कार्यशाळा होत आहे. केंद्रीय संरक्षणविषयक संशोधन आणि विकास विभागाचे सचिव तसेच डीआरडीओचे अध्यक्ष डॉ.समीर व्ही.कामत यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले.

एचईएमआरएलतर्फे भारतात प्रथमच ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेने शास्त्रज्ञ, तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरदार आणि संशोधक यांना नजीकच्या भूतकाळात मिळवलेले ज्ञान, अनुभव आणि तांत्रिक प्रगती यांची देवाणघेवाण करण्यासाठी मंच उपलब्ध करून दिला आहे. जगभरातील रशिया, जर्मनी, फ्रान्स, भारत इत्यादी अनेक देशांतील सुमारे अडीचशे प्रतिनिधी या कार्यशाळेत भाग घेत आहेत. डीआरडीओ आणि इस्रो या संस्थांच्या प्रयोगशाळा, शैक्षणिक संस्था आणि विविध उद्योग या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत.

गेल्या काही काळात, उच्च ऊर्जा आणि संबंधित तंत्रज्ञान क्षेत्रातझालेल्या नव्या घडामोडींविषयी चर्चा, विचारविनिमय करून त्यांची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने एचईएमएस-2023 चे आयोजन करण्यात आले आहे.उच्च ऊर्जा आणि विशेष पदार्थ यांच्या क्षेत्रातील नव्याने उदयाला येणाऱ्या पद्धतीही या कार्यशाळेची मध्यवर्ती संकल्पना आहे. उच्च ऊर्जा आणि विशेष पदार्थ यांच्यावर आधारित नव्या वस्तूंच्या विकासासाठी जगभरातील शास्त्रज्ञ आणि संशोधक यांच्यातील सहयोगी संबंध बळकट करणे हा या कार्यशाळेचा उद्देश आहे.विविध साधनांसाठी नव्या ऊर्जायुक्त पदार्थांचे संश्लेषण, गुणविश्लेषण तसेच मूल्यमापनअसंवेदनशील आणि हरित एचईएमएस, अत्याधुनिक उच्च विस्फोटक सूत्रांची मांडणी आणि साधने, अत्याधुनिक पायरोटेक्निक्स, एचईएमएस साधनांसाठी नॅनो मटेरियल्स, निःलष्करीकरण, टाकाऊ पदार्थ व्यवस्थापन, पर्यावरण विषयक अभ्यास आणि एचईएमएस साठी विल्हेवाट तंत्रज्ञान, विशेष पदार्थांच्या आणि इतर संबंधित तंत्रज्ञानांच्या क्षेत्रातील आधुनिक घडामोडी इत्यादी विषयांवर या कार्यशाळेतील चर्चा आणि विचारविनिमयात अधिक लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.

वर्ष 2004 पासून एचईएमएस वर आधारित आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या आयोजनाची सुरुवात झाली आणि त्यानंतर रशियातर्फे इटलीची पोलीटेक्निको डी मिलानो, फ्रान्सची एअरबस सफ्रोन लॉन्चर्स (अरियान समूह) आणि विद्यापीठ लिओन 1 तसेच जपानची जेएएक्सए या आंतरराष्ट्रीय सहयोगी संस्थांच्या मदतीने नियमितपणे या कार्यशाळेचे आयोजन होत आले आहे.

***

S.Patil/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1974296) Visitor Counter : 96


Read this release in: English , Urdu , Hindi