ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
खुल्या बाजारात विक्री योजनेअंतर्गत (देशांतर्गत )19 व्या ई-लिलावात 2.87 लाख मेट्रिक टन गव्हाची 2389 बोलीदारांना विक्री
Posted On:
02 NOV 2023 4:53PM by PIB Mumbai
तांदूळ, गहू आणि पिठाच्या किरकोळ किमतींवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने बाजार हस्तक्षेपासाठी भारत सरकारच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून, गहू आणि तांदूळ या दोन्हींचे साप्ताहिक ई लिलाव आयोजित केले जातात.2023-24 चा 19 वा ई-लिलाव 01.11.2023 रोजी आयोजित करण्यात आला होता.
खुल्या बाजारात गव्हाची उपलब्धता वाढवण्यासाठी, साप्ताहिक विक्रीसाठी काढलेल्या गव्हाचे प्रमाण 3 लाख मेट्रिक टन करण्यात आले आहे. आणि खुल्या बाजारात विक्री योजनेअंतर्गत (देशांतर्गत ) 01.11.2023. च्या अधिसूचनेद्वारे बोलीदार खरेदी करू शकणारी गव्हाची कमाल मात्रा 200 मेट्रिक टन पर्यंत वाढवण्यात आली आहे.
परिणामी, 01.11.2023 च्या ई-लिलावात 2.87 लाख मेट्रिक टन गव्हाची 2389 बोलीदारांना विक्री करण्यात आली आहे.
संपूर्ण भारतातील 2150/क्विंटलच्या राखीव किमतीच्या तुलनेत सामान्य चांगल्या दर्जाच्या गव्हाची वजनी सरासरी विक्री किंमत रु 2291.15/क्विटल होती, तर वैशिष्ट्ये शिथिल केलेल्या गव्हाची वजनी सरासरी विक्री किंमत रु. 2125/क्विटल राखीव किंमतीच्या तुलनेत रु. 2311.62/क्विटल होती.
किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी, खुल्या बाजारात विक्री योजनेअंतर्गत (देशांतर्गत ) गव्हाची विक्री 31.03.2024 पर्यंत सुरू राहील आणि 31.03.2024 पर्यंत 101.5 लाख मेट्रिक टन गहू विक्रीसाठी काढला जाईल, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे .
व्यापार्यांना खुल्या बाजारात विक्री योजनेअंतर्गत (देशांतर्गत ) गहू विक्रीपासून दूर ठेवण्यात आले आहे आणि साठेबाजी टाळण्यासाठी देशभरात 31.10.23 पर्यंत, 1721 अकस्मात तपासण्या करण्यात आल्या आहेत.
***
S.Patil/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1974277)
Visitor Counter : 109