अर्थ मंत्रालय
31 ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या सर्व मूल्यांकन वर्षांसाठी 7.85 कोटी इतक्या विक्रमी संख्येने प्राप्तिकर परतावे दाखल
Posted On:
01 NOV 2023 9:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर 2023
प्राप्तिकर विभागाने 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत प्राप्तिकर परतावा (आयटीआर) भरणाऱ्यांची विक्रमी संख्या नोंदवली आहे. कोणतेही आंतरराष्ट्रीय अथवा देशांतर्गत विशिष्ट व्यवहार नसलेल्या आणि ज्यांच्या खाते पुस्तकांचे लेखा परीक्षण करणे आवश्यक होते, अशा करदात्यांसाठी, आयटीआर (आयटीआर 7 व्यतिरिक्त) भरण्याची ही अंतिम तारीख होती.
आर्थिक वर्ष 2023-24 साठी 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत 7.65 कोटी पेक्षा जास्त आयटीआर दाखल करण्यात आले, जे 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत आर्थिक वर्ष 2022-23 साठी दाखल केलेल्या 6.85 कोटी आयटीआरच्या तुलनेत 11.7% जास्त आहे, मागील वर्षात असे आयटीआर दाखल करण्याची ती अंतिम तारीख होती.
तसेच, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 31 ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या सर्व मूल्यांकन वर्षांसाठी दाखल केलेल्या आयटीआर ची एकूण संख्या 7.85 कोटी आहे, जी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये दाखल केलेल्या एकूण 7.78 कोटी आयटीआरच्या तुलनेत, आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.
आर्थिक वर्ष 23-24 साठी दाखल केलेल्या 7.65 कोटी आयटीआरपैकी 7.51 कोटी पेक्षा जास्त आयटीआरची यापूर्वीच पडताळणी करण्यात आली आहे. तसेच, पडताळणी करण्यात आलेल्या 7.51 कोटी आयटीआरपैकी, 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत 7.19 कोटी आयटीआरवर यापूर्वीच प्रक्रिया करण्यात आली आहे. म्हणजे, पडताळणी करण्यात आलेल्या जवळजवळ 96% आयटीआर वर प्रक्रिया करण्यात आली आहे.
फॉर्म 10B, 10BB आणि फॉर्म 3CEB यासारखे काही वैधानिक दृष्ट्या महत्वाचे अर्ज भरण्यासाठी 31 ऑक्टोबर 2023 ही अंतिम तारीख होती. 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत 1.44 कोटींहून अधिक विविध प्रकारचे वैधानिक फॉर्म भरले गेले आहेत.
सर्व करदाते आणि कर व्यावसायिकांनी अनुपालनासाठी दिलेल्या पाठींब्याबद्दल आयटी विभागाने, कृतज्ञता व्यक्त केली आहे, आणि ज्या करदात्यांनी अद्याप फॉर्म अथवा आयटीआर भरले नाहीत, त्यांनी ते दाखल करावेत, अशी विनंती केली आहे. सर्व करदाते आणि कर व्यावसायिकांनी कर अनुपालन विहित वेळेत करत राहावे, असे आवाहन प्राप्तिकर विभागाने केले आहे.
* * *
R.Aghor/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1973974)
Visitor Counter : 132