कोळसा मंत्रालय
कोळसा उत्पादनात 28 ऑक्टोबरपर्यंत 12.81% वाढ
42.32 % वाढ नोंदवून, एकूण कोळसा साठा 53.23 दशलक्ष टनांवर पोहोचला
औष्णिक उर्जा प्रकल्पातील कोळशाचा पुरवठा वापरापेक्षा जास्त आहे
मिश्रण करण्यासाठी आयात केल्या जाणाऱ्या कोळशाचा वापर कमी होऊन 20.8 मेट्रीक टनावरुन वरून 13.5 मेट्रीक टनावर आला
Posted On:
30 OCT 2023 8:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2023
देशातील कोळसा उत्पादनात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात (28.10.23 पर्यंत) 12.81% वाढ झाली आहे. सीआयएलच्या वाढीची टक्केवारी 11.90% आहे, एससीसीएल मध्ये 7.82% आणि बंद आणि व्यावसायिक खाणींमध्ये 20.94% आहे. एकूण पुरवठ्यात 11.70% वाढ झाली आहे आणि मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत वीज क्षेत्राच्या पुरवठ्यात 7.87% वाढ झाली आहे.
रेल्वेची (समर्पित मालवाहतूक मार्गिकेसह) तुलनेने चांगली दळणवळण व्यवस्था आहे अशा कोळसा कंपन्यांमध्ये कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी कोळसा मंत्रालयाने सक्रिय पावले उचलली आहेत. इसीएल, बीसीसीएल, सीसीएल आणि डब्ल्यूसीएल यांचा यात समावेश असून त्यांनी अनुक्रमे 18.70%, 17.60%, 13.90% आणि 18.00% ची वाढ नोंदवली आहे.
कोळसा उत्पादक राज्यांमध्ये ऑक्टोबरच्या सुरुवातीला झालेल्या अभूतपूर्व पावसानंतर, गेल्या 15 दिवसांत कोळशाच्या उत्पादनाने वेग घेतला आहे. गेल्या 15 दिवसांत सर्व स्रोतांमधून एकूण उत्पादन दररोज 26.40 लाख टनांपेक्षा जास्त आहे.
या कालावधीत मिश्रण करण्यासाठी आयात केलेल्या कोळशाचा वापर 13.5 मेट्रिक टन इतका होता, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 20.8 मेट्रिक टन इतका होता. मिश्रणासाठी वापरण्यात आलेल्या आयात कोळशात 35% ची घट दर्शवितो.
औष्णिक उर्जा प्रकल्पाच्या कोळसा साठ्यातही वाढ झाली आहे. गेल्या दिवसात पुरवठ्यातील वाढ लक्षणीय आहे.
साधारणपणे, वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कोळशाचे उत्पादन आणि वाहतूक कमी असते कारण वर्षाच्या पहिल्या सहामाहीत प्रामुख्याने उन्हाळा आणि त्यानंतर पावसाळा असतो. पावसाळ्यानंतर, उत्पादन आणि वाहतुकीची परिस्थिती अनुकूल असते आणि दुसऱ्या सहामाहीत कोळशाचा पुरवठा वापरापेक्षा जास्त असतो. म्हणून, वर्षाच्या उत्तरार्धात, उर्जा प्रकल्प आणि खाणींमधे कोळशाचा साठा तयार होतो.
कोळशाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कोळसा मंत्रालय वचनबद्ध आहे आणि रेल्वे तसेच ऊर्जा मंत्रालयाशी समन्वय साधून आहे.
S.Kakade/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1973198)