संरक्षण मंत्रालय
05 एक्स डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट (DSC) प्रकल्पमधील दुसरे जहाज DSC A 21 चे (यार्ड 326) 30 ऑक्टोबर 23 रोजी कोलकात्याच्या मेसर्स टिटागड रेल सिस्टीम्स लिमिटेड (TRSL) द्वारे जलावतरण
प्रविष्टि तिथि:
30 OCT 2023 8:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2023
कोलकात्याच्या मेसर्स टिटागड रेल सिस्टीम्स लिमिटेड (TRSL) ने भारतीय नौदलासाठी बांधलेल्या 05 डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट (DSC) प्रकल्पमधील DSC A 21 च्या दुसऱ्या जहाजाचे जलावतरण 30 ऑक्टोबर 23 रोजी कोलकात्याच्या (पश्चिम बंगाल) टिटागड येथील हुगळी नदीत करण्यात आले. कार्मिक प्रमुख व्हीएडीएम के स्वामीनाथन हे या उद्घाटनपर सोहोळ्याचे अध्यक्ष होते. नौदलाच्या सागरी परंपरेला अनुसरून लैला स्वामीनाथन यांनी जहाजाचे जलावतरण केले.
या जहाजांची रचना बंदर आणि किनाऱ्याजवळ डायव्हिंग ऑपरेशन्ससाठी केली आहे आणि त्यात अत्याधुनिक डायव्हिंग उपकरणे बसवली आहेत. पाच डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट (DSC) बांधण्याचा करार 12 फेब्रुवारी 21 रोजी संरक्षण मंत्रालय आणि कोलकात्याच्या मेसर्स टिटागड रेल सिस्टिम्स लिमिटेड मध्ये झाला होता.
ही जहाजे भारतीय नौवहन नोंदणीच्या संबंधित नौदल नियम आणि नियमनानुसार स्वदेशी संरचना केलेली आणि बांधलेली आहेत. नियोजन टप्प्यात विशाखापट्टणम च्या नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा (NSTL), येथे डिझाइन टप्प्यादरम्यान जहाजांचे हायड्रोडायनामिक विश्लेषण/मॉडेल चाचणी घेण्यात आली. ही जहाजे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे अभिमानास्पद प्रतीक आहेत.
AY48.JPG)
EHF8.JPG)
S.Kakade/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1973190)
आगंतुक पटल : 149