दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

“प्रसारण आणि केबल सेवांसाठीच्या नियामक आराखड्याचा आढावा” घेण्यासंदर्भातील ट्रायच्या सल्लामसलत मसुद्यातील मुद्यांबाबत विरोधी टिप्पण्या स्वीकारण्याची अंतिम तारीख पुढे ढकलली

Posted On: 30 OCT 2023 7:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2023

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणा(ट्राय )ने 08 ऑगस्ट 2023 रोजी प्रसारण आणि केबल सेवांच्या नियामक आराखड्याचा आढावा घेण्यासंदर्भात  ट्रायचा सल्लामसलत मसुदा जारी केला होता. या मसुद्यामध्ये उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांसंदर्भात सुरुवातीला भागधारकांकडून देण्यात येणाऱ्या टिप्पण्या स्वीकारण्यासाठी 5 सप्टेंबर 2023 पर्यंत आणि या मुद्द्यांच्या विरोधातील सूचना स्वीकारण्यासाठी 19 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली होती.

सूचना स्वीकारण्याची अंतिम मुदत वाढवण्यासाठी भागधारकांनी वेळोवेळी केलेल्या विनंत्यांमुळे, लिखित स्वरूपातील टिप्पण्या तसेच विरोधी टिप्पण्या स्वीकारण्याची अंतिम मुदत अनुक्रमे,10 ऑक्टोबर 2023 आणि 25 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली.

भागधारकांकडून उपरोल्लेखित सल्लामसलत मसुद्यावर विरोधी टिप्पण्या सादर करण्याची मुदत वाढवण्याची विनंती करण्यात आल्यानंतर, आता विरोधी टिप्पण्या सादर करण्याची मुदत आणखी वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी 1 नोव्हेंबर 2023 ही अंतिम तारीख असेल. विरोधी टिप्पण्या सादर करण्यासाठीची कालमर्यादा आणखी वाढवण्यासाठी यानंतर करण्यात आलेली कोणतीही विनंती मान्य करण्यात येणार नाही.

यामध्ये स्वारस्य असणाऱ्यांना सदर विरोधी टिप्पण्या प्राधान्याने इलेक्ट्रॉनिक स्वरूपात advbcs-2[at]trai[dot]gov[dot]in  आणि jtadvbcs-1[at]trai[dot]gov[dot]in    या दोन ईमेल आयडी वर पाठवता येतील. अधिक तपशील किंवा माहितीसाठी कृपया ट्राय  सीएसआरचे महासंचालक आणि सल्लागार (बी&सीएस) अनिल कुमार भारद्वाज यांच्याशी   +91-11-23237922   या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

 

S.Kakade/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1973164) Visitor Counter : 97


Read this release in: Hindi , Tamil , Urdu , English , Telugu