नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ड्रोन्सची निर्मिती आणि चाचणी याबाबत प्रसिद्ध झालेल्या एका वृत्त लेखाबाबत स्पष्टीकरण

Posted On: 26 OCT 2023 8:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2023

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या निदर्शनास अलीकडेच प्रसिद्ध झालेला एक लेख आला आहे, ज्याबाबत स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. केंद्र सरकारने ड्रोन्सचे उत्पादन आणि चाचण्यांसंदर्भात मानके आणि मार्गदर्शक तत्वांचा मसुदा अंतिम केला असल्याचे या लेखात सूचित करण्यात आले आहे.

भारतामध्ये ड्रोन नियमन ड्रोन नियम 2021 आणि त्यानंतर नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या त्याबाबतच्या सुधारणांच्या अधीन असून ते 25 ऑगस्ट 2023 पासून लागू आहेत. भारतामध्ये ज्यांच्याकडे ड्रोनची मालकी आहे, ड्रोन बाळगले जातात, भाड्यावर दिले जातात, चालवले जातात, हस्तांतरित केले जातात किंवा देखभाल केली जाते आणि ज्यांच्याकडून देशाच्या हवाई क्षेत्रामध्ये त्यांचे परिचालन केले जाते त्या सर्वांना हे नियम लागू आहेत.

या नियमांतर्गत नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने यापूर्वीच मानवरहित विमान प्रणालीसाठी प्रमाणीकरण योजना 26 जानेवारी, 2022 रोजी अधिसूचित केली आहे. या योजने अंतर्गत निर्दिष्ट करण्यात आलेल्या मानकांची पुष्टी करणे आणि तशा प्रकारचे प्रमाणपत्र प्राप्त करणे यातून सवलत मिळालेली नसल्यास त्यांची पूर्तता करणे सर्व उत्पादकांसाठी  गरजेचे आहे आणि

सध्या 32 यूएएस मॉडेल्सना या योजने अंतर्गत संबंधित प्रमाणपत्र देण्यात आले आहे आणि इतर अनेक प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रक्रिये अंतर्गत आहेत. सध्याची मानके आणि प्रमाणीकरणाची मार्गदर्शक तत्वे ही योग्य आहेत आणि ती अंमलात आहेत. त्यामुळे कोणतेही नवे उत्पादन आणि चाचणी नियम लागू करण्याची प्रक्रिया जारी नाही.   

 

S.Bedekar/S.Patil/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1971682) Visitor Counter : 141


Read this release in: English , Urdu , Hindi