सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

31 ऑक्टोबर 2023 रोजी संपेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करण्यात आलेल्या स्मृतिचिन्हे आणि भेटवस्तूंच्या ई-लिलावाची 5वी फेरी


दुर्गापूजा आणि दसरा सणांमुळे ई-लिलावाला मिळणारा प्रतिसाद वाढला : मीनाक्षी लेखी

Posted On: 23 OCT 2023 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 ऑक्‍टोबर 2023

 

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हे सादर करणारा एक ई-लिलाव कार्यक्रम आयोजित केला आहे. या ई-लिलावामध्ये आमच्या समृद्ध वारशाचे प्रदर्शन करणाऱ्या कलाकृतींचा अनोखा संग्रह आहे. ई-लिलाव 02 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत https://pmmementos.gov.in/ वर आयोजित करण्यात आला आहे.

केंद्रीय सांस्कृतिक आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री  मीनाक्षी लेखी यांनी या ई-लिलावाबाबत माहिती देताना सांगितले की, दुर्गापूजा आणि दसरा सणांमुळे या ई-लिलावाला मिळणारा प्रतिसाद वाढला आहे. ही यशस्वी लिलावांच्या मालिकेतील 5 वी फेरी आहे, ज्याची पहिली फेरी जानेवारी 2019 मध्ये आयोजित करण्यात आली होती. त्या म्हणाल्या की, मागील 4 आवृत्त्यांमध्ये 7000 हून अधिक वस्तू ई-लिलावासाठी ठेवण्यात आल्या होत्या आणि यावेळी ई-लिलावासाठी 912 वस्तू आहेत.  त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारचा हा मोठा उपक्रम आपली राष्ट्रीय नदी, गंगा यांचे संवर्धन,  पुनर्संचयन करण्यासाठी आणि तिच्या संवेदनशील परिसंस्थेला चालना देण्यासाठी समर्पित आहे. या लिलावाद्वारे जमा होणारा निधी या उदात्त कार्यासाठी योगदान देण्यासाठी वापरला जाईल आणि या अमूल्य राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी आमची अटल वचनबद्धता मजबूत करेल.

  

मीनाक्षी लेखी यांनी पंतप्रधानामिळालेल्या स्मृतिचिन्हांच्या चालू ई-लिलावाबद्दल पत्रकार परिषद घेतली, या लीलावांच्या मालिकेची ही 5 वी यशस्वी फेरी आहे. त्यांनी 31 ऑक्टोबर 2023 रोजी संपणाऱ्या ई-लिलावाबद्दल माहिती दिली आणि या लिलावाने कशाप्रकारे लोकांमध्ये स्वारस्य निर्माण केले ते अधोरेखित केले.

 

* * *

G.Chippalkatti/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1970308) Visitor Counter : 116


Read this release in: Assamese , English , Urdu , Hindi