कोळसा मंत्रालय
21 ऑक्टोबर 2023 रोजी देशातला एकूण कोळसा साठा 71.35 दशलक्ष टन, मागील वर्षी याच काळात 60.44 मेट्रिक टन कोळसा साठा ; कोळसा उत्पादनात 12.73% नी वाढ
सध्या दैनंदिन कोळशाचा पुरवठा हा मागणीपेक्षा जास्त
सणाच्या हंगामात सामान्य उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी धोरण
कोळसा मंत्रालय, रेल्वे आणि उर्जा क्षेत्राशी समन्वय सुनिश्चित करणार
Posted On:
23 OCT 2023 8:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2023
ताज्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात 21 ऑक्टोबर 2023 पर्यंत देशातील कोळसा उत्पादनात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 12.73% वाढ झाली आहे. कोल इंडिया लिमिटेड (CIL) च्या उत्पादन वाढीची टक्केवारी 11.80%, सरकारी आणि राज्यांच्या कोळसा खाण कंपन्यांमध्ये (SCCL) 8.45% आणि बंदिस्त आणि व्यावसायिक खाणींमध्ये 20.50% एवढी उत्पादन वाढ झालेली आहे. दिनांक 21.10.2023 पर्यंत, देशातला एकूण कोळशाचा साठा 71.35 दशलक्ष टन (MT) (देशातल्या प्रमुख खाणींमध्ये, ट्रान्झिट आणि औष्णिक उर्जा प्रकल्पांमधील कोळशासह) आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत 60.44 मेट्रिक टन इतका होता, जो 18.05% जास्त आहे.
हेही लक्षात घेण्यासारखे आहे की, या कालावधीत कोळशाची आयात 13.5 मेट्रिक टन होती, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत 20.8 मेट्रिक टन होती, ज्यामुळे मिश्रित उद्देशांसाठी, देशातल्या कोळसा वापरात 35% ची घट झाली आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला कोळसा उत्पादक राज्यांमध्ये दीर्घकाळ पाऊस पडल्यानंतर, गेल्या 10 दिवसांत कोळसा उत्पादनात वाढ झाली आहे. गेल्या 10 दिवसांत सर्व स्रोतांमधून एकूण कोळसा उत्पादन 26.57 लाख टन प्रतिदिन आहे, जे अपवादात्मकरित्या जास्त आहे. गेल्या एका आठवड्यात, औष्णिक वीज केंद्राच्या शेवटी असलेल्या कोळशाच्या साठ्याचा कल उलट झाला आहे. आता कोळशाचा दैनंदिन पुरवठा सरासरी दैनंदिन मागणीपेक्षा जास्त आहे आणि कोळशाचा साठा वाढण्याचा कल दिसून येत आहे.
वर्षाच्या पहिल्या सहामाहीत प्रामुख्याने, प्रखर उन्हाळा आणि त्यानंतर पावसाळा असल्यामुळे एच 1(H1) काळात कोळशाचे उत्पादन आणि वाहतूक कमी राहिली. त्यामुळे, पिटहेड खाणींमध्ये आणि औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये कोळशाचा साठा एच 1(H1) या काळात कमी झाल्याची नोंद आहे आणि वर्षाच्या उत्तरार्धात कोळशाच्या उत्पादनात वाढ दिसून येते, कारण पावसाळ्यानंतर उत्पादनासाठी परिस्थिती अनुकूल असते. एच 2 (H2) काळात पुरवठा हा मागणीपेक्षा जास्त असतो, म्हणून वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत, वीज प्रकल्प आणि खाणींमध्ये कोळशाचा साठा तयार होतो.
विजेची प्रचंड मागणी असूनही, कोळसा मंत्रालयाने देशातील सर्व औष्णिक ऊर्जा केंद्रांवर कोळशाची पुरेशी उपलब्धता राखली आहे.
कोळसा मंत्रालयाने हंगामात कंत्राटी कामगारांना जास्त वेतन देऊन सणासुदीच्या काळात कोळशाचे सामान्य उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी धोरण तयार केले आहे. यामुळे कोल इंडिया लिमिटेड (CIL) ने महाअष्टमी या दिवशी सुद्धा कोणत्याही सामान्य दिवसाच्या बरोबरीने 21 लाख टन कोळसा उत्पादन केले आहे.
कोळसा मंत्रालयाने 31 मार्च 2024 पर्यंत औष्णिक उर्जेच्या प्रमुख प्रकल्पामधून 40 दशलक्ष टन आणि खाणींमध्ये 75 दशलक्ष टनांहून अधिक ( उपयुक्त अंतिम साठा) क्लोजिंग स्टॉक सुनिश्चित करण्याची योजना आखली आहे.
कोळशाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कोळसा मंत्रालय वचनबद्ध आहे आणि रेल्वे आणि ऊर्जा मंत्रालयाशी योग्य समन्वय साधत आहे.
* * *
G.Chippalkatti/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1970258)
Visitor Counter : 101