संरक्षण मंत्रालय
द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी, भारताचे संरक्षण सचिव आणि झांबियाच्या संरक्षण मंत्रालयाचे स्थायी सचिव यांच्यात नवी दिल्ली येथे चर्चा
झांबियामध्ये लहान शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि इतर उपकरणांच्या निर्मितीमध्ये सहकार्याच्या संधी शोधण्यास सहमती
Posted On:
20 OCT 2023 11:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2023
भारताचे संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी झांबियाच्या संरक्षण मंत्रालयाचे स्थायी सचिव नॉर्मन चिपाकुपाकू यांच्याबरोबर 20 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे बैठक घेतली. या बैठकीदरम्यान, दोन्ही देशांच्या सचिवांनी परस्पर देशांमधील ऐतिहासिक आणि दीर्घकालीन संबंधांवर चर्चा केली आणि द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक दृढ करण्याची अपेक्षा व्यक्त केली. भारत आणि झांबिया यांच्यात 2019 मध्ये स्वाक्षरी करण्यात आलेला संरक्षण सहकार्यावरील सामंजस्य करार, संरक्षणाशी संबंधित विविध क्षेत्रातील सहकार्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो.
लष्करी प्रशिक्षण आणि विविध लष्करी अभ्यासक्रमांच्या माध्यमातून तसेच भारताच्या प्रशिक्षक चमूला नेमून, झांबियाच्या संरक्षण दलाची क्षमता वाढवण्यासाठी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही, भारताच्या संरक्षण सचिवांनी झांबियाच्या सचिवांना दिली.
भारताचे संरक्षण सचिव गिरीधर अरमाणे यांनी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत विविध प्रकारच्या मोहिमांमध्ये भारतीय संरक्षण उद्योगांच्या कामगिरीवर प्रकाश टाकला. झांबियाच्या स्थायी सचिवांनी भारतीय संरक्षण उद्योगांच्या प्रगतीबद्दल प्रशंसा केली आणि झांबियाच्या संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणासाठी उच्च-गुणवत्तेच्या आणि किफायतशीर उपकरणे उपलब्ध करून समर्थन देण्याची अपेक्षा केली. झांबियामध्ये लहान शस्त्रे, दारुगोळा आणि इतर संरक्षण उपकरणांच्या निर्मितीमध्ये सहकार्याच्या संधी शोधण्यावर दोन्ही बाजूच्या सचिवांनी यावेळी सहमती दर्शवली.
झांबियाच्या संरक्षण मंत्रालयाचे स्थायी सचिव यांच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय शिष्टमंडळ 15-22 ऑक्टोबर 2023 दरम्यान भारत दौऱ्यावर आहे. या शिष्टमंडळाने भारतीय सशस्त्र दलांच्या विविध आस्थापनांना तसेच सार्वजनिक आणि खाजगी, क्षेत्रातल्या विविध भारतीय संरक्षण उद्योगांच्या उत्पादन एककांना भेटी दिल्या.
* * *
M.Pange/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1969763)
Visitor Counter : 105