इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी “मेड-इन-इंडिया” 2 केडब्ल्यू डीसी (2KW DC) पोर्टेबल चार्जरचे केले लोकार्पण
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                20 OCT 2023 11:00PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2023
 
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे(MeitY), सचिव एस. कृष्णन यांनी आयआयटी (IIT) मद्रास येथे इलेक्ट्रिक वाहन वापराला चालना देण्यासाठी आयआयटी (IIT) मद्रास रिसर्च पार्क सेंटर ऑफ एक्सलन्सन विभागाने स्वदेशी तंत्रज्ञान वापरून विकसित केलेल्या 2 केडब्ल्यू डीसी (2KW DC) पोर्टेबल चार्जरचे लोकार्पण केले.
यावेळी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकारी,  सुनीता वर्मा GC (R&DE), MeitY, आयआयटी (IIT) मद्रास प्रा. अशोक झुनझुनवाला आणि मंत्रालयातले आणि आयआयटी मद्रासचे इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मेळाव्याला संबोधित करताना सचिव एस. कृष्णन म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मेक इन इंडिया मेक फॉर द वर्ल्ड’ हा दृष्टिकोन, तंत्रज्ञानाचे अधिकाधिक स्वदेशीकरण विकसित करून आणि विविध प्रकारचे उद्योग उभारून साध्य करता येईल. आता, भारत आयात करणारे राष्ट्र  राहिले नसून निर्यात करणारे राष्ट्र असा परिवर्तित झाला आहे, या प्रकारचा नवोन्मेश आणि समन्वय भारताला ‘आत्म निर्भर भारत’ बनवेल.
  
सचिव पुढे म्हणाले की, भारतात अशा प्रकारच्या डिझाईनची निर्मिती झाल्यामुळे घरगुती आयपीला चालना मिळेल आणि देशातील स्टार्ट-अप परिसंस्थेला गती मिळेल. त्यांनी पुढे नमूद केले की, आयआयटी एम रिसर्च पार्क आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त ब्रँड आहे. हे संशोधन पार्क मोठ्या आत्मविश्वासाने सतत नवनवीन उपक्रमांना प्रोत्साहन देत आहे. या संशोधन केंद्रामध्ये डिझाइन केलेले नवीन 2 केडब्ल्यू ईव्ही (2 KW EV) चार्जर आणि पुनर्नवीनीकरण सामग्री वापरणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला या उपक्रमाशी निगडीत असल्याचा खूप अभिमान आहे”
 
* * *
G.Chippalkatti/V.Yadav/D.Rane
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com  
/PIBMumbai   
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 1969683)
                Visitor Counter : 148