सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सांस्कृतिक मंत्रालयाने देशभरातील 449 पैकी 404 ठिकाणी राबवली स्वच्छता मोहीम


राष्ट्रीय विज्ञान परिषद संग्रहालयाने (NCSM) टाकाऊ सिरिंज आणि वायर्स पासून बनवले डासाचे शिल्प

Posted On: 20 OCT 2023 8:47PM by PIB Mumbai

 

विशेष अभियान 3.0 च्या अंमलबजावणी टप्प्याच्या तिसऱ्या आठवड्यात, सांस्कृतिक मंत्रालयाने (MoC) लक्षणीय प्रगती साधली आहे. या कालावधीत मंत्रालयाने केलेली एकंदर कामगिरी पुढील प्रमाणे:

 

S.No.

Items

Target

Achievements

1.

MP References

176

48

2

PMO References

33

13

3

State Government References

28

7

4

Parliamentary Assurance

41

18

5

Public Grievances

412

210

6

Public Grievances Appeals

465

62

 

त्याशिवाय, देशभरातील 449  ठिकाणांपैकी 404 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मंत्रालयाने भंगार सामानाची विल्हेवाट लावून सुमारे 1050 चौ. फूट. क्षेत्रफळाची जागा मोकळी केली असून, याद्वारे रु.3,57,999 इतका महसूल जमा झाला. याशिवाय, 15,969 फायलींपैकी 8072 फायली आणि 2133 ई-फाईल्सपैकी 114 ई-फाईल्सचे पुनरावलोकन करून त्या बंद करण्यात आल्या.

सर्वोत्तम उपक्रम: सर्वोत्तम उपक्रमांचा एक भाग म्हणून सांस्कृतिक मंत्रालया अंतर्गत काही संस्थांनी हाती घेतलेले उपक्रम पुढील प्रमाणे:

(A) “वेस्ट टू आर्ट”, अर्थात कचऱ्यापासून कलाया संकल्पनेवर, राष्ट्रीय विज्ञान परिषद संग्रहालयाने (NCSM) टाकाऊ सिरिंज आणि वायर्स यासारख्या वस्तूंचा वापर करून डासाचे शिल्प तयार केले आहे. राष्ट्रीय विज्ञान परिषद संग्रहालयाने कचऱ्यामधील पुठ्ठ्यापासून एक जिराफाचे शिल्प देखील तयार केले असून, यामधून कचऱ्यापासून कला ही संकल्पना स्पष्ट होते.

1697711022405.jpg 1697710422874.jpg

(B) नॉर्थ ईस्टर्न झोनल कल्चरल सेंटर (NEZCC) ने देखील गुवाहाटी मधील NEZCC शिल्पग्राम कॉम्प्लेक्स, येथे 16 ते 18 ऑक्टोबर 2023 दरम्यान वेस्ट टू आर्टया थीमवर 3 दिवसीय कार्यशाळा/अभियान आयोजित केले होते. या ठिकाणी टाकाऊ वस्तूंचा वापर करून माँ दुर्गा आणि हरणाची शिल्पे तयार करण्यात आली होती.

1697710778594.jpg 1697710768275.jpg

(टाकाऊ वस्तूंचा वापर करून बनवलेले दुर्गा मातेचे शिल्प)

(C) भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभाग देखील स्मारके आणि 25 जागतिक वारसा स्थळांसह मंत्रालयाने निश्चित केलेल्या 449 स्थळांपैकी 400 स्थळांवर उत्साहाने स्वच्छता मोहीम राबवत आहे. ओदिशा मधील युनेस्को द्वारे घोषित जागतिक वारसा स्थळ असलेले कोणार्क सूर्य मंदिराच्या परिसरात आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेची झलक पुढील प्रमाणे:

 

(युनेस्को, जागतिक वारसा स्थळ सूर्य मंदिर, कोणार्क, ओदिशा, येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली)

अभिलेखांच्या पुनर्संचयित संवर्धनाचा एक भाग म्हणून, नॅशनल आर्काइव्ह ऑफ इंडिया (एनएआय) ने आपल्या संग्रहातील 21,425 पत्रके, 140 फाईल्स आणि 45 खंडांच्या नोंदी दुरुस्त केल्या आहेत. याशिवाय गृह मंत्रालय आणि कोळसा मंत्रालयाने, एनएआय ला  नॅशनल आर्काइव्ह ऑफ इंडियाला अनुक्रमे 452 आणि 572 फाइल्सच्या मूल्यांकनासाठी सूचित केले आहे. एनएआय ने सार्वजनिक अभिलेख नियमांच्या तरतुदींनुसार वरील फाइल्सच्या संयुक्त मूल्यांकनाची कार्यवाही सुरू केली आहे. विशेष अभियान 3.0 अंतर्गत, 23 ऑक्टोबर 2023 रोजी भारतीय संस्कृती आणि पुरातत्व सर्वेक्षण मंत्रालयातील विभाग अधिकारी आणि अवर सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांसाठी एनएआय च्या सहयोगाने रेकॉर्ड व्यवस्थापनावरील विशेष प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले आहे. दैनंदिन प्रगतीचे परीक्षण केले जात आहे आणि ते SCDPM पोर्टलवर अपलोड केले जात आहे.

***

G.Chippalkatti/R.Agashe/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1969598) Visitor Counter : 97


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri