श्रम आणि रोजगार मंत्रालय
कृषी आणि ग्रामीण मजुरांसंबंधित अखिल भारतीय ग्राहक दर निर्देशांक - सप्टेंबर, 2023
Posted On:
20 OCT 2023 7:39PM by PIB Mumbai
कृषी क्षेत्राशी संबंधित मजूर आणि ग्रामीण भागातले मजूर यांच्याशी संबंधित असलेल्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक क्रमांक (आधार: 1986-87=100) सप्टेंबर, 2023 या महिन्यासाठी अनुक्रमे 2 अंक आणि 3 अंकांनी वाढून अनुक्रमे 1226 (एक हजार दोनशे आणि सव्वीस ) आणि 1237 (एक हजार दोनशे सदतीस) गुण एवढा राहिला. तांदूळ, डाळी, हळदी उत्पादने, कांदा, साखर, गुळ, मिरची, लसूण, मिश्रित मसाले इ. वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे कृषी क्षेत्राशी संबंधित मजूर आणि ग्रामीण भागातले मजूर यांच्या सामान्य निर्देशांकात वाढ झाली आणि अन्न गटातून तो अनुक्रमे 1.13 आणि 0.88 अंकांपर्यंत राहिला.
निर्देशांकातील वाढ/घसरण राज्यानुसार बदलते. शेतमजुरांच्या बाबतीत, 15 राज्यांमध्ये 3 ते 12 गुणांची वाढ दिसून आली तर 4 राज्यांमध्ये 2 ते 12 गुणांची घट नोंदवली गेली, तर 1 राज्यासाठी (राजस्थान) कोणती वाढ किंवा घट दिसून आली नाही. 1413 गुणांसह तामिळनाडू निर्देशांकात अव्वल तर हिमाचल प्रदेश 949 गुणांसह तळाशी राहिले.
ग्रामीण मजुरांच्या बाबतीत, 14 राज्यांमध्ये 3 ते 12 गुणांची वाढ आणि 5 राज्यांमध्ये 3 ते 12 गुणांची घट नोंदवली गेली, तर 1 राज्यासाठी (राजस्थान)कोणती वाढ किंवा घट दिसून आली नाही. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू ही राज्ये प्रत्येकी 1400 गुणांसह निर्देशांकात अव्वल तर हिमाचल प्रदेश 1000 गुणांसह तळाशी राहिले.
मुख्यतः तांदूळ, गहू आटा, डाळी, दूध, कांदा, गुळ, आणि कापड (कापूस, गिरणी) किमतीत वाढ झाल्यामुळे कृषी मजूर आणि ग्रामीण मजुरांसाठीच्या (प्रत्येकी १२ गुण) ग्राहक किंमत निर्देशांकात उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. याउलट, शेतमजूर आणि ग्रामीण मजूर यांच्या ग्राहक किंमत निर्देशांकात सर्वाधिक घट आंध्र प्रदेशमध्ये (प्रत्येकी १२ गुण)मुख्यत: बाजरी, मासे कोरडे, हिरव्या मिरच्या, भाज्या आणि फळे इ. किमतीत घट झाल्याने दिसून आली.
कृषी क्षेत्राशी संबंधित मजूर आणि ग्रामीण भागातले मजूर यांच्याशी संबंधित असलेल्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-AL आणि CPI-RL) वर आधारित महागाईचा पॉइंट टू पॉइंट दर सप्टेंबर, 2023 मध्ये 6.70% आणि 6.55% राहिला जो ऑगस्ट, 2023 महिन्याच्या तुलनेत अनुक्रमे 7.37% आणि 7.12% राहिला जो मागच्या वर्षीच्या याच महिन्यात अनुक्रमे 7.69% आणि 7.90% एवढा होता. त्याचप्रमाणे,सप्टेंबर, 2023 मध्ये अन्नधान्य महागाई 8.06% आणि 7.73% एवढा राहिला. जोऑगस्ट, 2023 मध्ये अनुक्रमे 8.89% आणि 8.64% एवढा होता आणि मागील वर्षाच्या याच महिन्यात 7.47% आणि 7.52% एवढा राहिला होता.
अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक क्रमांक (सामान्य आणि गटवार):
Group
|
Agricultural Labourers
|
Rural Labourers
|
|
August, 2023
|
September, 2023
|
August, 2023
|
September, 2023
|
General Index
|
1224
|
1226
|
1234
|
1237
|
Food
|
1164
|
1166
|
1170
|
1171
|
Pan, Supari, etc.
|
1994
|
2004
|
2004
|
2014
|
Fuel & Light
|
1303
|
1307
|
1295
|
1299
|
Clothing, Bedding &Footwear
|
1253
|
1261
|
1300
|
1307
|
Miscellaneous
|
1272
|
1274
|
1276
|
1278
|
ऑक्टोबर 2023 या महिन्यासाठी कृषी क्षेत्राशी संबंधित मजूर आणि ग्रामीण भागातले मजूर यांच्याशी संबंधित असलेला अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक(CPI – AL आणि RL) 20 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध होईल.
***
G.Chippalkatti/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1969595)
Visitor Counter : 165