नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह यांनी हरित हायड्रोजन विकासकांची घेतली भेट


हरित हायड्रोजन विकासकांच्या  समस्या सोडवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांचे आश्वासन 

हरित हायड्रोजन निर्यात बाजारपेठेत सरकार भारताची स्पर्धात्मकता सुनिश्चित करणार: केंद्रीय मंत्री आर. के. सिंह 

प्रविष्टि तिथि: 20 OCT 2023 6:09PM by PIB Mumbai

 

केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह यांनी गुरुवारी, 19 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे संबंधित मंत्रालये, हरित हायड्रोजन विकासक आणि उद्योग संघटनांची बैठक घेतली. विकासकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यावर मात करण्यासाठी सरकार कशी मदत करू शकेल हे जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी बोलताना आर.के. सिंह म्हणाले की, हायड्रोजन विकसकांना व्यवसाय करणे सुलभ व्हावे, यासाठी ऊर्जा मंत्रालय आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय संबंधित मंत्रालयांच्या सहयोगाने काम करेल. भारत ही एक उदयोन्मुख शक्ती आहे. आपल्या सिंगल युनिफाइड ग्रिड आणि मोठ्या नवीकरणीय क्षमतेसह, भारत जगातील सर्वात स्वस्त हरित हायड्रोजनची निर्मिती करू शकतो. हरित हायड्रोजन उत्पादनात भारताला स्पर्धात्मक बनवण्यासाठी आणि राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनचे (NGHM) निर्धारित लक्ष्य साध्य करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू”,  असे केंद्रीय मंत्री म्हणाले.

संबंधित समस्यांबाबत नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने सादरीकरण केले. यामध्ये नमूद करण्यात आले की 1 दशलक्ष मेट्रिक टन हायड्रोजन निर्मितीसाठी 25 GW अक्षय उर्जा आवश्यक आहे तर 1 दशलक्ष मेट्रिक टन हरित अमोनिया निर्मितीसाठी 5 GW अक्षय उर्जा आवश्यक आहे.

उद्योग प्रतिनिधींना त्यांच्या आगामी हरित हायड्रोजन/अमोनिया प्लांट्सच्या जागा आणि त्यासाठी आवश्यक असलेली क्षमता सामायिक करण्याची विनंती करण्यात आली, जेणेकरून त्यासाठी आवश्यक पारेषण पायाभूत सुविधांचे नियोजन करता येईल.

***

G.Chippalkatti/R.Agashe/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1969560) आगंतुक पटल : 147
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi