संरक्षण मंत्रालय

बहुपक्षीय नौदल सराव (मिलान) - 24 साठी अंतरिम नियोजन परिषद

Posted On: 20 OCT 2023 6:31PM by PIB Mumbai

 

विशाखापट्टणम येथे 19 ते 27 फेब्रुवारी 24 या कालावधीत भारतीय नौदल यजमानपद भूषवणार असलेल्या  मिलान 24 (बहुपक्षीय नौदल सराव - 2024) ची अंतरिम नियोजन परिषद पूर्व नौदल कमांड द्वारे 17 ऑक्टोबर 23 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आली. यात मित्र परदेशी नौदले सहभागी झाली होती.   परिषदेदरम्यान, निमंत्रित देशांच्या प्रतिनिधींना बंदर आणि सागरी टप्प्यातील  नियोजित कार्यक्रमांची माहिती देण्यात आली.

मिलान हा द्विवार्षिक बहुपक्षीय नौदल सराव असून याची सुरुवात भारतीय नौदलाने 1995 मध्ये केली.  मुळात  भारताच्या 'लूक ईस्ट पॉलिसी'शी सुसंगत संकल्पना असलेल्या या सरावाचा, इतर मित्र विदेशी देशांना सहभागी  करण्यासाठी भारत सरकारच्या 'ऍक्ट ईस्ट पॉलिसी' आणि  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि प्रगती  (SAGAR) उपक्रमानुसार विस्तार झाला.  मिलान 22 सराव   25 फेब्रुवारी  ते 04 मार्च 2022 दरम्यान विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आला होता.  त्यात 39 देश सहभागी झाले होते.

मिलान  24 च्या बंदर  टप्प्यात आंतरराष्ट्रीय सागरी परिसंवाद,  किनाऱ्यावर सिटी परेड, स्वावलंबन प्रदर्शन, विषय तज्ज्ञांकडून माहितीचे आदानप्रदान  यांचा समावेश असेल. भारतीय नौदलाच्या एककांसह मित्र  परदेशी देशांची  जहाजे, सागरी गस्ती विमाने आणि  पाणबुड्या सागरी टप्प्यात सहभागी होतील. त्यामध्ये मोठ्या स्तरावरील युद्धाभ्यास, प्रगत हवाई संरक्षण मोहीम, पाणबुडीविरोधी युद्ध आणि पृष्ठभागविरोधी युद्ध मोहिमा  यांचा समावेश असेल.

भारताच्या जी 20 अध्यक्षते पाठोपाठ मिलान सरावाचे आयोजन होत असून  या सरावाच्या आयोजनामुळे पुन्हा एकदा जी 20 संकल्पना  वसुधैव कुटुंबकमसाकार होईल. विशाखापट्टणम येथे 19 - 27 फेब्रुवारी 2024 दरम्यान आयोजित मिलान 24 मध्ये 50 पेक्षा जास्त देशांना आमंत्रित करून  आजपर्यंतचा सर्वात मोठा सहभाग पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे.

***

G.Chippalkatti/S.Kakade/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1969549) Visitor Counter : 124


Read this release in: English , Urdu , Hindi