ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
राष्ट्रीय ग्राहक आणि विवाद निवारण आयोगातील दोन रिक्त पदांसाठी ग्राहक व्यवहार विभागाने मागवले अर्ज
Posted On:
16 OCT 2023 4:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2023
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाअंतर्गत ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय ग्राहक आणि विवाद निवारण आयोगातील सदस्यांच्या दोन विद्यमान रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत, हा आयोग ग्राहक संरक्षण कायदा, 2019 अंतर्गत ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत विविध अपीलांच्या सुनावणीसाठी स्थापन केलेले अपीलीय प्राधिकरण आहे. आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
ग्राहक व्यवहार विभागाने केवळ ऑन लाईन पद्धतीनेच अर्ज मागवले आहेत.
उमेदवाराच्या नियुक्तीचे निकष, पात्रता, वेतन आणि इतर अटी तसेच शर्ती न्यायाधिकरण सुधारणा कायदा आणि न्यायाधिकरण (सेवेच्या अटी) नियम, 2021 च्या तरतुदींद्वारे नियंत्रित केल्या जातील.
या पदावर नियुक्तीसाठी नावांची शिफारस करण्याकरता न्यायाधिकरण सुधारणा कायदा 2021 अंतर्गत स्थापन केलेल्या शोध-सह-निवड समितीद्वारे संबंधित पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता आणि अनुभव यांना योग्य महत्व देऊन त्याआधारे उमेदवारांची योग्यता ठरवली जाईल आणि त्यातील काही उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी आमंत्रण दिले जाईल. उमेदवारांची पात्रता, अनुभव आणि त्यांच्याशी व्यक्तिगत पातळीवर साधलेला संवाद या आधारे समितीने केलेल्या उमेदवारांच्या एकंदरीत मूल्यांकनानुसार अंतिम निवड केली जाईल.
पात्र आणि इच्छुक अधिकार्यांचे अर्ज 29 नोव्हेंबर 2023 पर्यंत URL: jagograhakjago.gov.in/ncdrc द्वारे ऑनलाइन मागवले आहेत. ऑनलाइन सादर केलेल्या अर्जाची प्रत जेथे लागू असेल तेथे विहित दस्तऐवजांसह योग्य माध्यमाद्वारे अवर सचिव (CPU), ग्राहक व्यवहार विभाग, कक्ष क्रमांक ४६६-ए, कृषी भवन, नवी दिल्ली येथे २९ नोव्हेंबर २०२३ पर्यंत सादर केली जाऊ शकते.
* * *
S.Kane/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1968144)
Visitor Counter : 110