रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जम्मू-काश्मीरमधील शेर-ए-बीबी येथे अंदाजे 12 कोटी रुपये खर्चून 224 मीटर पुलाचे (2-लेन) बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Posted On: 16 OCT 2023 4:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 ऑक्‍टोबर 2023

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक्स वरील एका पोस्टमध्ये सांगितले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये शेरे बीबी येथे आम्ही अंदाजे 12 कोटी रुपये खर्चून 224 मीटर पुलाचे (2-लेन) बांधकाम  यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

  

गडकरी म्हणाले की ही पायाभूत सुविधा राष्ट्रीय महामार्ग-44 च्या रामबन ते बनिहाल विभागात निर्माण करण्यात आली आहे.  या विस्तीर्ण प्रकल्पाचा एक भाग असलेला हा 224-मीटरचा मार्ग  केवळ प्रवासाचे अंतर 125 मीटरने कमी करत नाही तर यामुळे उभा उतार सुद्धा कमी होतो. तसेच 80 अंशांपेक्षा जास्त डोंगर उतार असलेल्या रस्त्यांवरचा तीव्र उतार देखील कमी होतो. शिवाय, हा रस्ता शेर-बीबी प्रदेशातील उतारांच्या आव्हानात्मक भूप्रदेशामध्ये आवश्यक असे बदल करून वाहनांच्या सुरळीत वाहतुकीची सोय करतो.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, या प्रकल्पामुळे या क्षेत्राच्या आर्थिक वाढीला हातभार लागेल आणि एकूणच संपर्क व्यवस्था सुधारेल हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.  ते म्हणाले की  पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आम्ही जम्मू आणि काश्मीर राज्यात महामार्गाच्या पायाभूत सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेवर ठाम आहोत.

 

* * *

S.Kane/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1968134) Visitor Counter : 127