वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताची सप्टेंबर 2023 मध्ये एकूण निर्यात 63.84 अब्ज अमेरिकी डॉलर्स मूल्याएवढी; सप्टेंबर 2023 मध्ये व्यापारी मालाची निर्यात 34.47 अब्ज अमेरिकी डॉलर्स मूल्याएवढी

प्रविष्टि तिथि: 13 OCT 2023 8:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 ऑक्‍टोबर 2023

 

भारताने सप्टेंबर 2023 मध्ये एकूण 63.84 अब्ज अमेरिकी डॉलर्स मूल्याएवढी निर्यात केली. सप्टेंबर 2023 मध्ये देशाने  34.47 अब्ज अमेरिकी डॉलर्स मूल्याएवढी व्यापारी मालाची निर्यात केली. 

एप्रिल-सप्टेंबर 2023 दरम्यान व्यापारी तूट 47% ने सुधारून  39.91 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी राहिली. वाणिज्यिक मालाची व्यापार तूट एप्रिल-सप्टेंबर 2022 मधील 140.83 अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून सुधारून  एप्रिल-सप्टेंबर 2023 मध्ये 115.58 अब्ज अमेरिकी डॉलर्स राहिली. 

बिगर पेट्रोलियम आणि बिगर रत्ने व आभूषणाची  निर्यात 1.86% ने वाढून सप्टेंबर 2022 मधील 24.33 अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून सप्टेंबर 2023 मध्ये 24.78 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली. 

अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीत विक्रमी  6.8% वाढ होऊन सप्टेंबर 2022 मधील  8.34  अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून सप्टेंबर 2023 मध्ये ती  8.91 अब्ज अमेरिकी डॉलर्स नोंदवली गेली. 

सागरी उत्पादनांची निर्यात 4.7% ने वाढून सप्टेंबर 2022 मधल्या  0.72 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या  तुलनेत सप्टेंबर 2023 मध्ये ती  0.75 अब्ज अमेरिकी डॉलर्स झाली.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत एप्रिल-सप्टेंबर 2022 मधील 10.27 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या  तुलनेत  27.6% वाढ होऊन एप्रिल-सप्टेंबर 2023 दरम्यान ती 13.11 अब्ज अमेरिकी डॉलर्स झाली. 

सिरॅमिक उत्पादने आणि काचेच्या वस्तूंची निर्यात सप्टेंबर 2022 मधील  0.24  अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून 50.5% ने  वाढून सप्टेंबर 2023 मध्ये ती  0.36 अब्ज अमेरिकी डॉलर्स झाली. 

औषधे आणि फार्मा निर्यात  9.0% ने वाढून सप्टेंबर  2022 मधील  2.19 अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून ती  सप्टेंबर 2023 मध्ये 2.39 अब्ज अमेरिकी डॉलर्स झाली. 

एप्रिल-सप्टेंबर 2023 दरम्यान लोह खनिजाच्या निर्यातीत 128% ची वाढ नोंदवली गेली आहे जी एप्रिल-सप्टेंबर 2022 मधील  0.66 अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून 1.5 अब्ज अमेरिकी डॉलर्स झाली. 

एप्रिल-सप्टेंबर 2023 दरम्यान कृषी निर्यात सातत्याने वाढली. यात मसाले (1.35%), फळे आणि भाज्या (10.67%), तृणधान्ये आणि विविध प्रक्रिया केलेल्या वस्तू (1.89%), तेलबिया पेंड  (41.16%), तंबाखू (7.6%), तेल बिया (23.47%), कॉफी (3.43%), काजू (0.31%) यांचा समावेश आहे. 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

*Link for Quick Estimates

 

* * *

R.Aghor/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1967530) आगंतुक पटल : 224
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी