संरक्षण मंत्रालय
लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी नागा रेजिमेंटच्या तिसर्या बटालियनला प्रदान केला प्रतिष्ठेचा ‘प्रेसिडेंट्स कलर्स’ पुरस्कार
Posted On:
13 OCT 2023 6:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2023
लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी 13 ऑक्टोबर 2023 रोजी उत्तराखंडमध्ये रानीखेत येथे कुमाऊं रेजिमेंटल केंद्रात आयोजित पथसंचलनादरम्यान नागा रेजिमेंटच्या तिसर्या बटालियनला प्रतिष्ठेचा ‘प्रेसिडेंट्स कलर्स’ पुरस्कार प्रदान केला.
कवायतींचे निरीक्षण केल्यानंतर लष्करप्रमुखांनी नागा रेजिमेंटच्या, परिचलन, प्रशिक्षण आणि क्रीडा प्रकारांसह लष्करी उपक्रमांच्या सर्व क्षेत्रातील समृद्ध परंपरेची प्रशंसा केली. अत्यंत कमी कालावधीत स्थापन करण्यात आलेल्या रेजिमेंटच्या नवीन दलाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल, लष्कर प्रमुखांनी त्यांचे अभिनंदन केले, आणि मोठ्या अभिमानाने देशसेवा करण्यासाठी सर्व श्रेणींच्या अधिकार्यांना शुभेच्छा दिल्या.
लेफ्टनंट जनरल आर पी कलिता, जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ, पूर्व कमांड, कुमाऊ आणि नागा रेजिमेंट आणि कुमाऊ स्काउट्सचे कर्नल, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणि, कुमाऊ आणि नागा रेजिमेंट आणि कुमाऊ स्काउट्सचे कर्नल, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणि, जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ, सेंट्रल कमांड, यांच्यासह सेवेमधील आणि सेवानिवृत्त कर्मचारी रंगीत सादरीकरण परेडला उपस्थित होते.
* * *
R.Aghor/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1967478)
Visitor Counter : 133