कंपनी व्यवहार मंत्रालय
भारतीय दिवाळखोरी आणि नादारी मंडळाने, दिवाळखोरी आणि नादारी संहिता, 2016 अंतर्गत अधिसूचित नियमनांची अनुपालन प्रक्रिया सोपी करण्यासाठी, ताण आणि खर्च कमी करण्यासाठी मागवल्या सूचना
Posted On:
12 OCT 2023 9:31PM by PIB Mumbai
भारतीय दिवाळखोरी आणि नादारी मंडळाने(IBBI) सार्वजनिक आणि नियामक संस्थांकडून नियमन सुलभ करण्यासंदर्भात, तसेच अनुपालनाचा ताण आणि खर्च कमी करण्यासंदर्भात सूचना मागवल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या घोषणेचा पाठपुरावा म्हणून या सूचना मागवण्यात आल्या आहेत:
“ अनुपालन सुलभ करण्यासाठी, त्यावरील ताण आणि खर्च कमी करण्यासाठी, सध्या अस्तित्वात असलेल्या नियमनांचा सर्वसमावेशक आढावा घेण्याची विनंती वित्तीय क्षेत्रातील नियामकांना करण्यात येईल. यासाठी ते सार्वजनिक आणि नियामक संस्थांकडून आलेल्या सूचनांचा विचार करतील. विविध प्रकारच्या नियमनांतर्गत अर्जांवर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा देखील निश्चित करण्यात येईल.”
आपल्या सूचना आयबीबीआयच्या https://ibbi.gov.in/webfront/regulation_comment.php या वेबसाईटवर ऑनलाईन पाठवता येतील. यासाठीची प्रक्रिया यापूर्वी 4 मे 2023 रोजीच्या प्रसिद्धी पत्रक क्रमांक IBBI/PR/2023/05 नुसार असेल (प्रसिद्धी पत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा) नियमन तयार करण्यापूर्वी व्यापक आणि पारदर्शक सार्वजनिक सल्लामसलती व्यतिरिक्त, आयबीबीआय खालील प्रमाणे आपल्या नियमनांचा दुहेरी आढावा घेणाऱ्या यंत्रणेचे अनुसरण करते –सार्वजनिक टिप्पण्या मागवल्यानंतर नियमनांचा वार्षिक आढावा. अपेक्षित उद्दिष्टे आणि साध्य फलनिष्पत्तीसह निर्धारित केलेल्या निकषांवर आधारित नियमनांचा दर तीन वर्षांनी आढावा.
2021 मध्ये तीन वर्षांची आढावा प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि आयबीबीआयने या वर्षी 4 मे 2023 रोजी नियमनांच्या वार्षिक आढाव्यासाठी सार्वजनिक टिप्पण्या मागवण्यासाठी एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. टिप्पण्या आणि सूचना पाठवण्यासाठी 31 डिसेंबर 2023 ही अंतिम तारीख आहे. टिप्पण्या प्राप्त केल्या जात आहेत आणि त्यांची तपासणी केली जात आहे.
दिवाळखोरी आणि नादारी संहिता, 2016 च्या कलम 188 आणि 196 सह वाचलेले कलम 240 भारतीय दिवाळखोरी आणि नादारी मंडळाला नियमन तयार करण्याचा अधिकार प्रदान करते. आयबीबीआयने नियमनाच्या संदर्भात सल्लामसलतीची पद्धत, नियमनांची रचना करणे आणि आढावा घेणे यासाठी आयबीबीआय (नियमन जारी करण्यासाठी यंत्रणा) नियमन, 2018 तयार केली आहे.
****
NM/Shailesh P/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1967323)
Visitor Counter : 108