पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

आपली अर्थव्यवस्था आणि बाजारपेठांना नवा आकार देणाऱ्या अनेक युनिकॉर्न स्टार्ट-अप्सचा भारत साक्षीदार : केंद्रीय मंत्री हरदीप एस पुरी


तेल आणि वायू सार्वजनिक क्षेत्र उपक्रम विविध क्षेत्रात स्टार्ट-अप्सना चालना देत आहेत : हरदीप एस पुरी

Posted On: 11 OCT 2023 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2023

आपली उत्साही उद्यमशील वृत्ती आणि वेगाने विस्तारणाऱ्या स्टार्ट-अप परिसंस्थेसह आपली अर्थव्यवस्था आणि बाजारपेठांना नवा आकार देणाऱ्या अनेक युनिकॉर्न स्टार्ट-अप्सचा भारत साक्षीदार ठरला आहे, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू  मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे.   युनिकॉर्नच्या संख्येच्या बाबतीत भारत आज जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि एकत्रितरित्या 347 अब्ज अमेरिकी  डॉलर्स  मूल्याचे मिळून  100 पेक्षा जास्त युनिकॉर्न आहेत.

केपीएमजीच्या 'एनरिच 2023' कार्यक्रमांतर्गत  14 व्या नवोन्मेष आणि ऊर्जा परिषदेमध्ये ते  बोलत होते.

तेल आणि वायू क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांनी 405 कोटी रुपयांचा  स्टार्टअप निधी  तयार केला आहे.  तेल आणि वायू सार्वजनिक उपक्रमांनी 232 स्टार्टअप्सना 208 कोटी रुपयांच्या संवितरित मूल्यासह साहाय्य केले  आहे, असे पुरी यांनी  सांगितले.

पुरी यांनी  हरित  हायड्रोजन क्षेत्राबद्दलदेखील माहिती दिली.  हरित हायड्रोजन ही आणखी एक शाश्वत इंधन विकासाची संधी असून त्यात भारत वेगाने प्रगती करत असल्याचे त्यांनी सांगितले.  सरकारने सुरू केलेल्या हरित  हायड्रोजन अभियानामध्ये वर्ष  2030 पर्यंत 5 एमएमटीपीए हरित हायड्रोजन उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.  हरित  हायड्रोजनमध्ये भविष्य असल्याचे त्यांनी सांगितले.

Sl No

 Company Name

Net Zero Target Year

1

IOCL

2046

2

ONGC

2038

3

GAIL

2040

4

BPCL

2040

5

HPCL

2040

6

OIL

2040

7

EIL

2035

बेस लोड  गरजा पूर्ण करण्यासाठी पारंपारिक ऊर्जा स्रोत आवश्यक आहेत, तर नवीन आणि नाविन्यपूर्ण ऊर्जा स्रोत हवामान बदलाचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.  आम्ही आमच्या नागरिकांसाठी ऊर्जा उपलब्धता,  परवडणारी ऊर्जा आणि ऊर्जा सुलभता सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे पुरी यांनी सांगितले.

 

N.Chitale/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1966823) Visitor Counter : 72


Read this release in: English , Urdu , Hindi