विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अत्याधुनिक क्वांटम-तंत्रज्ञानाने समर्थित हरित हायड्रोजन उत्पादनांचे,पर्यावरण अनुकूल भवितव्यासाठी अनावरण

Posted On: 11 OCT 2023 3:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2023

नवीन उच्च थ्रूपुट क्वांटम समर्थित ग्रीन हायड्रोजन उत्पादन तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात पर्यावरण अनुकूल उत्पादनांस (ग्रीन हायड्रोजन उत्पादनास) गती देऊ शकते.

बनारस हिंदू विद्यापीठाच्या ग्रीन केपलरेट समूहाने विकसित केलेल्या या नवीन तंत्रज्ञानाचे उदघाटन वाराणसी येथील विद्यापीठात विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या हवामान बदल आणि स्वच्छ ऊर्जा विभागाच्या प्रमुख डॉ अनिता गुप्ता, आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातील शास्त्रज्ञ आणि हवामान बदल आणि स्वच्छ ऊर्जा विभाग संचालक डॉ. रंजित कृष्णा पै, आणि आयआयटी दिल्लीतील तज्ञ समितीचे अध्यक्ष प्रा. आर. आर.सोंडे तसेच देशभरातील नामवंत विशेषज्ञांच्या उपस्थितीत झाले.

डॉ. सोमनाथ गराई आणि प्रा. एस. श्रीकृष्ण यांच्या समूहाने विकसित केलेल्या या तंत्रज्ञानाने पर्यावरणपूरक ऊर्जा पर्याय म्हणून ग्रीन हायड्रोजनचा वापर केला आहे.उच्च प्रोटॉन उपलब्धता आणि गतिशीलतेसह चार्ज ट्रान्सफर सिस्टमसह पुढील पिढीत क्वांटम-शक्तीवर चालणारे फोटो-कॅटलिस्ट त्यांनी सादर केले आणि ऊर्जा निर्मितीसाठी क्वांटम उत्प्रेरकांचे अनुप्रयोग सादर केले.

क्लीन एनर्जी रिसर्च इनिशिएटिव्ह, हायड्रोजन अँड फ्युएल सेल प्रोग्राम अंतर्गत बूस्टिंग द एच2 इकॉनॉमी बाय हार्नेसिंग द मेरिट्स ऑफ क्वांटम एन्कॅप्स्युलेशन केमिस्ट्री: ऑगमेंटेड कायनेटिक्स फॉर वॉटर स्प्लिटिंग रिअॅक्शन अंडर कॉन्फिनमेंट या शीर्षकाखाली या तंत्रज्ञानाचे पेटंट,प्रलंबित आहे

अत्याधुनिक फोटोकेमिकल-अणुभट्टीच्या या डिझाईनमध्ये सौरऊर्जा जास्तीत जास्त खेचून घेण्यासाठी अंगभूत प्रदीपन रचना आणि बाह्य पटल परावर्तित पॅनेल्स ही या रचनेची वैशिष्ट्ये आहेत. सतत इलेक्ट्रॉन्सच्या प्रोटॉन्सचा  पुरवठा जोडलेली प्रणाली, ज्यामध्ये औद्योगिक धातू-कचऱ्याचा वापर करून इलेक्ट्रॉन इंजेक्टर यंत्रणा चालविली जाते अशाप्रकारची रचना या समूहाने यात तयार केली आहे,आणि कठोर ऑप्टिमायझेशननंतर, लॅब स्केलवर ग्रीन हायड्रोजन उत्पादनाचा सर्वोच्च दर सुमारे 1 लीटर/मिनिट प्रति 10 इतका गाठला गेला आहे.

ग्रीन केपलरेट समूहाने उत्पादित हायड्रोजन वायूचे सरळपणे अंतर्गत ज्वलन करणारे उच्च तंत्रज्ञान यात वापरले असून, अतिरिक्त शुद्धीकरणाशिवाय  हे इंधन वापरले जाऊ शकते, त्यामुळे तंत्रज्ञान उचित किंमतीला उपलब्ध होऊ शकते. ही परिवर्तनशील नवकल्पना ऊर्जा उत्पादनापासून वाहतूक आणि कृषी क्षेत्रातील अनुप्रयोगांपर्यंतच्या विविध क्षेत्रांमध्ये विस्तृत कार्यांसाठी उपयुक्तता  प्रदान करेल.

डीएसटीचे अर्थसहाय्य लाभलेल्या या प्रकल्पात ग्रीन केपलरेट टीमने स्टोरेज फ्री डायरेक्ट हायड्रोजन अंतर्गत ज्वलन इंजिन तंत्रज्ञानाची संकल्पना वापरली आहे आणि या प्रकल्पाचा एक भाग म्हणून विविध श्रेणीच्या ऑटोमोबाईल्सच्या इंजिन/सिलेंडर कार्यक्षमतेसाठी ते प्रदर्शित केले आहे.

 

N.Meshram/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1966612) Visitor Counter : 136


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi