अंतराळ विभाग
azadi ka amrit mahotsav

“गगनयान” चाचणी वाहन अंतराळयान म्हणजेच “गगनयान” चाचणी वाहन विकासयानाचे (टीव्ही-डी1) प्रक्षेपण 21 ऑक्टोबर रोजी नियोजित असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन


अंतिम मानवी अंतराळ मोहीम "गगनयान" पूर्वी, पुढील वर्षी होणाऱ्या चाचणी उड्डाणात "व्योममित्र" या महिला रोबो अंतराळवीराला नेणार

Posted On: 10 OCT 2023 5:25PM by PIB Mumbai

 

"गगनयान" चाचणी वाहन अंतराळयानाचे प्रक्षेपण, म्हणजेच "गगनयान" चाचणी वाहन विकासयानाचे (TV-D1) प्रक्षेपण  या महिन्याच्या 21 तारखेला होणार आहे.

चांद्रयान मोहिमेशी संबंधित इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या सत्कार कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे ही माहिती दिली.

इस्रो "गगनयान" मोहिमेचा महत्त्वाचा भाग असलेल्या क्रू एस्केप प्रणालीच्या कार्यक्षमतेची चाचणी देखील करेल, परिणामी 2024 पर्यंत मानवरहित आणि मानवीय अंतराळ मोहीमा होतील. ही चाचणी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात केली जाणार आहे. क्रू मॉड्यूल गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाईल.

चाचणीमध्ये बाह्य अवकाशात क्रू मॉड्यूलचे प्रक्षेपण करणे आणि ते पृथ्वीवर परत आणणे आणि बंगालच्या उपसागरात सुरक्षित उतरवून ताब्यात घेणे अंतर्भूत आहे. भारतीय नौदलाच्या कर्मचार्‍यांनी मॉड्यूल पुनर्प्राप्त करण्यासाठी आधीच प्रात्यक्षिके सुरू केली आहेत.

या चाचणीच्या यशामुळे पहिल्या मानवरहित "गगनयान" मोहिमेचा टप्पा निश्चित होईल, अशी माहिती मंत्र्यांनी दिली. अंतिम मानवी "गगनयान" अंतराळ मोहिमेपूर्वी, पुढील वर्षी चाचणी उड्डाण होणार आहे, ज्यामध्ये "व्योममित्र" या महिला रोबो अंतराळवीराला नेले जाईल, असे ते म्हणाले.

ते म्हणाले, भारताच्या अंतराळ मोहिमेची रचना किफायतशीर आहे.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, इस्रो हे भारताच्या नारीशक्तीचे प्रतीक आहे ज्यामध्ये महिला वैज्ञानिक केवळ सहभागी होत नाहीत तर अंतराळ संशोधन कार्यक्रमातील विविध उपक्रमांचे नेतृत्व देखील करतात.

***

N.Chitale/V.Joshi/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1966420) Visitor Counter : 134


Read this release in: English , Hindi , Urdu , Odia , Telugu